Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

घोटाळेबाज रुचिता जयपुरियार आणि गॅंगकडून लोकांना कोट्यावधींचा चुना; स्वस्त दरात गाड्या देण्याचे आमिषा दाखवून केली फसवणूक

महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने केला या घोटाळ्याचा पर्दाफाश

मुंबई/ठाणे : मागील काही वर्षात महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने अनेक मोठ्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला असून यात आता आणखी एका घोटाळ्याची भर पडली आहे. विरार येथे वास्तव्यास असलेल्या रमा कदम(नाव बदललेले आहे) या विवाहित महिलेची ठाणे येथील रुचिता जयपुरियार व आणखी दोघांनी मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याबाबतची अधिकृत तक्रार महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम कडे गत आठवड्यात आली असून या प्रकरणात हजारो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याचे कळते. ठाणे येथील रुचिता जयपुरियार हिने आर एस सोल्यूशन(RS Solutions) नावाने कंपनी स्थापन करत स्वस्तात दुचाकी, चार चाकी वाहनं तसेच इलेक्ट्रोनिक साहित्य देत सुरुवातील अनेकांना आपल्या जाळ्यात ओढलं. अल्पावधीतच तिच्या या स्कीमला चांगला प्रतिसाद मिळू लागला. यात काही पोलिसांनीही तिच्याकडून वस्तु खरेदी केल्या. विरार येथील रमा कदम(नाव बदललेले आहे) यांनाही एक चारचाकी वाहन घ्यायचं होत. याच काळात एका नातेवाईकाच्या माध्यमातून कदम व त्यांच्या पतीची या कंपनीसाठी सावज हेरणार्‍या दोघा एजंट्स शी ओळख झाली. यातील रणजीत भोसले(राहणार-भांडुप) याने रुचिता जयपुरियार हिचा उजवा हात असलेल्या राम उर्फ रामदास मोरे (राहणार-भांडुप) सोबत दोघांची भेट घालून देत त्याच्या मार्फत मारुति स्विफ्ट कार तीन लाख रुपयांत घेऊन देण्याचे वचन दिले. यानंतर ठरल्याप्रमाणे २ लाख रुपये रकमेचा चेक व एनईएफटी च्या माध्यमातून रुपये १ लाख असे एकूण ३ लाख रुपये रुचिता जयपुरियार हिच्या फेडरल बँक, (मानपाडा, ठाणे) येथील शाखेत जमा केले. १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२१ दरम्यान झालेल्या या व्यवहारानंतर मारुति सुजुकी स्विफ्ट या गाडीचा ताबा तात्काळ मिळणे गरजेचे होते. परंतू तसे झाले नाही रुचिता व तिचे साथीदार गाडीची डिलीवरी आज देतो उद्या देतो असे बहाणे करत दिवस लांबवत राहिले.

 

आपली फसवणूक झाल्याचे जेव्हा रमा कदम यांच्या लक्षात आले तेव्हा वेळ निघून गेली होती. कारण या प्रकरणी खोलात शिरल्यावर रमा व त्यांच्या पतीला असे कळले की ठाणे हिरानंदांनी इस्टेट येथे वास्तव्यास असलेली रुचिता जयपुरियार ही आर्थिक फसवणुकीच्या इतर काही गुन्ह्यात फरार असून अटकपूर्व जमीन मिळवण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. रुचिता जयपुरियार व तिच्या साथीदारांनी आणखी किती लोकांची फसवणूक केली आहे हे येत्या काळात पोलिस तपासात निष्पन्न होईलच परंतू, क्षुल्लक लालसेपायी आपल्या घामा रक्ताच्या कमाईची वाफ होऊ न देणे ही स्वतः गुंतवणूकदारांची जबाबदारी असून याच सोबतीला अशा घोटाळेबाजांना वेळीच अटकाव करणे हे पोलिस प्रशासनाचेही तितकेच कर्तव्य आहे. अद्यापही राम उर्फ रामदास मोरे, रणजीत भोसले व शंकर साळुंखे ही मंडळी पैशांबाबत विचारणा केल्यावर उडवा-उडवीची उत्तरं देत असल्याचा थेट आरोप रमा यांनी केला आहे. या प्रकरणी पीसीएमसीएस(PCMCS) अधिनियम 1978 च्या  कलम 2 (सी), 3 व 4, एमपीआयडी(MPID) अॅक्ट तसेच भा.द.वि. च्या कलम ४२० व ४१८ अंतर्गत रुचिता जयपुरियार व तिचे साथीदार राम उर्फ रामदास मोरे, रणजीत भोसले व इतर यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याकामी महाराष्ट्र वार्ता ची लीगल टीम रमा कदम यांना मदत करत आहे. परंतू या प्रकरणी इतरही पीडितांनी पुढे येणे गरजेचे आहे जेणेकरून आरोपीतांवर अटक व संपत्ती जप्तीसारखी कठोर कारवाई तात्काळ होईल व त्यांनाही न्याय मिळेल. आपलीही या घोटाळ्यात काही फसवणूक झाली असेल तर आपण महाराष्ट्र वार्ता च्या आपली समस्या टीम ला news@maharashtravarta.com वर ईमेलद्वारे व 9372236332 वर व्हाटसप्पद्वारे पुराव्यांसह तक्रार नोंदवू शकता. आमचे संबंधित प्रतीनिधी आपणास सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळात संपर्क करतील.

महाराष्ट्र वार्ता ने पोलखोल केलेली राज्यातील इतर प्रकरणे वाचा

 

SCAM 2020! पुण्यातील ‘ऑसमॉस टेक्नॉलॉजी’ चा २३६ कोटींचा घोटाळा? न चुकता वाचा संपूर्ण रिपोर्ट

 

Scam: २३६ कोटींच्या ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी घोटाळ्या प्रकरणी गृह विभागाने घेतली गंभीर दखल

 

‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ ! आणखी एका घोटाळेबाज MLM कंपनीचा टीम महाराष्ट्र वार्ता ने केला पर्दाफाश

 

Maharashtra Varta Exposes: Trustee Kersi Parekh alleges Scam in Mumbai Port Trust’s Super Speciality hospital project worth Rs. 693 crores

 

अजिंक्य डी. वाय. पाटील इन्फ्रा आणि झोडीयाक हीलोन्ट्रोनिक्स कंपनीला मुंबई पोर्ट ट्रस्ट कडून धक्का

 

‘पॅनकार्ड क्लब लिमिटेड’ कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे राज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे निर्देश

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *