Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Scam: २३६ कोटींच्या ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी घोटाळ्या प्रकरणी गृह विभागाने घेतली गंभीर दखल

राज्याच्या गृह उपसचिवांनी दिले दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश

पुणे/मुंबई: गेल्या महिन्यात महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारिता विभागाने ऑपरेशन ब्लॅक मार्ट अंतर्गत पुणे स्थित ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केलेल्या २३६ कोटी रुपयांपेक्षा मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर फसगत झालेल्या अनेक जणांनी आम्हाला संपर्क करत ई-मेलद्वारे आपली कैफियत मांडली. याच सोबत अनेकांनी काही नव्या घोटाळेबाज MLM कंपन्यांबाबत आम्हाला माहितीही दिली.

या सर्व पार्श्वभूमीवर सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या व कायद्याची पायमल्ली करणाऱ्या घोटाळेबाजांना गजाआड करण्यासाठी महाराष्ट्र वार्ता च्या लीगल टीम ने ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजी कंपनीची तक्रार आधी पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेला दिली व त्यानंतर राज्याचे गृह उपसचिव सनदी अधिकारी शिरीष मोहोड यांच्याकडेही सविस्तर तक्रार दिली.

अखेर या तक्रारीची तातडीने दखल घेत उपसचिव शिरीष मोहोड यांनी दोन ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्यास सांगित लवकरात लवकर उत्तर देण्यास सांगितले. पुणे पोलिसांनी आम्ही पाठविलेल्या पहिल्या तक्रारीला वेळेत उत्तर न दिल्यामुळे नाईलाजाने अखेर लीगल टीम ने गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सदर प्रकरणाकडे थेट लक्ष वेधले.

सदर घोटाळ्या प्रकरणी संचालक बाबुराव महाजन, शुभांगी वैभव पाटस्कर व प्रशांत रामचंद्र रौउंदळे यांची प्रमुख संशयित आरोपींमध्ये नावं असली तरी टीम लीडर यांच्यावरही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे कारण अनेक पीडितांनी या टीम लीडर्स च्या बँक खात्यांवर आंधळा विश्वास ठेवत पैसा जमा केले असून GST विभागानेही या संबंध प्रकरणी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. येत्या काही दिवसांत ‘जीएसटी’ विभागाकडेही लीगल टीम तक्रार दाखल करणार आहे. सध्यातरी पुणे पोलिस संबंधितांवर कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आधीच्या बातमीची लिंक : https://www.maharashtravarta.com/osmose-fraud/

आपल्याकडेही अशाच प्रकारे सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची माहिती असेल तर आपण आम्हाला news@maharashtravarta.com वर ई-मेल द्वारे व 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे पुराव्यानिशी कळवू शकता.

लिंक क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *