Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

SCAM 2020! पुण्यातील ‘ऑसमॉस टेक्नॉलॉजी’ चा २३६ कोटींचा घोटाळा? न चुकता वाचा संपूर्ण रिपोर्ट

महाराष्ट्र वार्ता ने ‘ऑपरेशन ब्लॅकमार्ट’ अंतर्गत केला मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश

पुणे/मुंबई: गेल्या २५-३० वर्षांत MLM नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांनी देशातील करोडो लोकांना चुना लावला आहे. प्रत्येक कंपनीचे काही न काही नवीन प्रॉडक्ट किंवा सेवा असते जी अगदी तकलादू असते किंवा त्यांची किंमत अव्वाच्या सव्वा असते.

महाराष्ट्र वार्ताच्या ‘आपली समस्या’ टीम ने ‘ऑपरेशन ब्लॅकमार्ट’ मोहिमेअंतर्गत ‘ऑसमॉस(Osmose) टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ या एका संशयास्पद व्यवहार असलेल्या कंपनीकडे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे लक्ष वेधत आहे. ११८० रुपये भरा आणि दर दिवशी २० रुपये कमवा अशा स्वरूपाची जाहिरात करत या कंपनीने भोळ्या-भाबड्या व तितक्याच गरजू लोकांना आपल्या जाळ्यात ओढलंय.

आम्ही एका मेंबरकडून या स्कीम बाबत माहिती जाणून घेतली. या मेंबरचेही पैसे या स्कीम मध्ये अडकले आहेत. मेंबर होण्यासाठी तुम्हाला टीम/ग्रुप लीडर जवळ सर्वात आधी ११८० रुपये जमा करावे लागतात. हे पैसे जमा केल्यावर तुम्हाला ऑसमॉस कंपनीकडून एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळतो. यांनंतर ऑसमॉस च्या वेबसाईटवर नोंदणी केल्यावर तुमच्या विंडो मध्ये तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध असलेले प्रोडक्टस दिसतात जे बाजारभावापेक्षा फार महाग आहेत. याशिवाय दररोज रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी तुमच्या ओसमोस च्या ‘वॉलेट’ मध्ये २० रुपये जमा होतील असेही सांगण्यात येते. अशाच प्रकारे तुम्हीही ऑसमॉस कंपनीस नवीन सदस्य जोडून ट्री प्लॅन प्रमाणे वाढीव मिळकत मिळवू शकता असे त्यांचे म्हणणे होते. याचसोबत कंपनीचं म्हणणं आहे की त्यांचे फेसबुक सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ऍप असून ज्यावर मेंबर्स कडून रोज ३-४ मिनिटं खर्च केली जातात ज्यामुळे आम्हाला गूगल ऍड च्या माध्यमातून उत्पन्न मिळते. याच सोबत कंपनी गेमिंग क्षेत्रात असल्याचेही म्हणते आहे. हे सर्व उद्योग करण्यासाठी व यातून आलेले उत्पन्न वाटण्यासाठी कंपनीला कायद्याने पब्लिक लिमिटेड होत शेअर मार्केट मधून सनदशीर मार्गाने पैसे उभारण्याचा पर्याय होता. पण हे सारं करण्यासाठी नियत स्वच्छ असणे आवश्यक आहे.

कंपनीचे सध्याचे चित्र निराळेच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दर दिवसाला येणारे पैसे बंद झाल्याचे अनेक गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे. या सार्‍या पार्श्वभूमीवर कंपनीचे म्हणणे असे की आता आम्ही ऑसमॉस कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत असल्याकारणाने थोडे दिवस तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. येत्या काळात तुम्हाला क्रिप्टो करन्सी मार्फत पे आऊट मिळेल असे गाजर कंपनी सध्या दाखवत असल्याचे कळते. मुळात क्रिप्टो करन्सी वापरास भारतात बंदी आहे. यासंदर्भात आम्ही कंपनीशी त्यांच्या अधिकृत क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा फोन बंद लागला. आमच्या लीगल टीम ने जेव्हा या कंपनीबाबत खोलात माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आढळले की ही कंपनी अवघ्या १२ महिन्यांपूर्वी म्हणजेच २४ डिसेंबर २०१९ रोजी स्थापित करण्यात आली असून विजय बाबुराव महाजन, शुभांगी वैभव पाटस्कर व प्रशांत रामचंद्र रौउंदळे हे तिघेजण या कंपनीच्या संचालक मंडळावर असल्याची माहिती आम्हाला मिळाली. यांचे ऑफिस पुण्यातील कोथरूड परिसरात असून येथून सर्व कारभार हाकला जातो. या कंपनीने लोकांकडून थेट आपल्या खात्यात अधिकृतरित्या पैसे गोळा न करता एक वेगळीच क्लुप्ती लढवली. यांनी टीम लीडर च्या माध्यमातून लोकांकडून पैसे गोळा केले ज्यासाठी ‘गूगल पे’ सारख्या डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर केला गेला.

२० लाख सदस्य संख्या गुणिले ११८० रुपये

एकूणच असे दिसते की यात दृश्य स्वरूपात तीन माणसे असली तरी टीम लीडर आणि इतर मंडळीही या घोटाळ्यात सहभागी असल्याचे स्पष्ट दिसतेय. या कंपनीशी संबंधित सर्व लोकांच्या बँक खात्यांची तपासणी होण गरजेचे आहे.

उपलब्ध माहितीनुसार सध्या २० लाख लोकं या कंपनीचे मेंबर्स असून त्याप्रमाणे हा घोटाळा जवळपास २३६ कोटी रुपयांचा असल्याचे स्पष्ट होते आहे. या कंपनीकडे भारतीय रिझर्व्ह बँकेची तसेच सेबीचीही परवानगी नसताना अशा प्रकारे खुलेआम लोकांकडून पैसे गोळा करण्याचं धाडस या कंपनीने कोणाच्या आशीर्वादाने केलं ही बाबही समोर येणं आवश्यक आहे.

अशा प्रकारे दाखल करू शकता तक्रार

सदर विषयात संबंधितांवर PCMCS ऍक्ट १९७८ च्या सेक्शन २(c), ३ व ४ अंतर्गत तसेच MPID ऍक्ट अंतर्गत कारवाई करता येऊ शकते. महाराष्ट्र वार्ताची लीगल टीम या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण पुणे पोलिस, मुंबई पोलिस, नवी मुंबई पोलिस, नाशिक पोलिस याच सोबत राज्याच्या सायबर क्राईम विभागाकडेही तक्रार दाखल करत आहे. या प्रकरणी येत्या आठवड्यात महाराष्ट्र वार्ता चे वरिष्ठ प्रतिनिधी राज्य आर्थिक गुन्हे अन्वेषण चे अति. महासंचालक व सक्तवसुली संचालनालय(ED) यांच्या मुंबई विभागीय संचालकांची भेट घेत अधिकृत तक्रार दाखल करणार आहे. लॉकडाऊन पूर्वी महाराष्ट्र वार्ता ने ‘पर्लवाईन इंटरनॅशनल’ नावाच्या अशाच प्रकारे वेबसाईटद्वारे फसव्या योजना चालवणाऱ्या कंपनीची तक्रार महाराष्ट्र वार्ताने ईडी (सक्तवसुली संचालनालय) कडे केली होती.

ज्या पीडितांना आपल्या तक्रारी संबंधित पोलीस आयुक्तालयांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखांपर्यंत पोहोचवायच्या असतील त्यांनी विभागवार दिलेल्या खालील ई-मेल वर आपली तक्रार पुराव्यांसह दाखल करावी व त्यात या बातमीची लिंक सोबत जोडावी. याच सोबत आर्थिक गुन्हे चे राज्य पोलीस अतिरिक्त महासंचालक श्री. नवल बजाज यांनाही आपण ई-मेल मध्ये CC ठेवू शकता. ११८० रुपयांसाठी कोणी पोलीस तक्रार करणार नाही या भ्रमात असलेल्या अशा घोटाळेबाजांना चांगलीच अद्दल घडवण्यासाठी कायदे सक्षम आहेत यात दुमत नाही फक्त आपण सजग असणं गरजेचं आहे.

ईडी (सक्तवसुली संचालनालय) : 1) dir-enforcement@nic.in  2) ed-del-rev@nic.in 3) dla-ed-enforcement@nic.in

पुणे पोलीस आयुक्त : cp.pune@nic.in

पुणे शहर आर्थिक/Cyber गुन्हे DCP : dcpcyber.pune@nic.in

मुंबई आर्थिक गुन्हे DCP : dcpeowzone-mum@mahapolice.gov.in

Mumbai Cyber Crime : dcpcybercrime.mum@mahapolice.gov.in

नवी मुंबई DCP Crime : dcpcrime.navimumbai@mahapolice.gov.in

ठाणे आर्थिक गुन्हे DCP :  cp.thane.dcpeow@mahapolice.gov.in

रायगड SP : sp.raigad@raigadpolice.gov.in

CC to राज्य अति. पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे : adg.eowms@mahapolice.gov.in

आपल्याकडेही अशाच प्रकारे सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची माहिती असेल तर आपण आम्हाला news@maharashtravarta.com वर ई-मेल द्वारे व 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे पुराव्यानिशी कळवू शकता.

लिंक क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *