Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उरण येथील हनुमान कोळीवाडा पुनर्वसित जागेची प्रशासनाकडून पाहणी

१ डिसेंबर रोजी होणारे आंदोलन आता २०२२ च्या २६ फेब्रुवारीला

उरण, दि.२५(विठ्ठल ममताबादे): रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली दि १७ नोव्हेंबर रोजी ४ वाजता हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ व जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जेएनपीटीच्या जसखार येथील भराव केलेल्या जमिनीत शासनाने सन १९८५ शासन निर्णयाने शेवा (हनुमान) कोळीवाडा गावातील ८६ शेतकरी १७० बिगर शेतकरी असे एकूण २५६ कुटुंबांना भूखंड जमीन वाटपाचे आणि शासनाच्या मापदंडाने नागरी सुविधा देण्याचे कामाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्यावर सोपविली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, जे. एन. पी. टी. प्रशासनाचे अधिकारी राजेश फडके, न्हावा शेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे आणि इतर अधिकारी यांनी कस्टम वसाहत जवळील जेएनपीटिच्या विकसित जमिनीत शासनाच्या माप दंडा नुसार ७१० गुंठ्यात २५६ भूखंड आणि शासनाच्या मापडंदा नुसार नागरी सुविधा देण्याचे मान्य व कबूल केले आहे. यावेळी सदर जमिनीची पाहणी शासकीय अधिकारी व हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी केली. पुनर्वसनाचे काम करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने वेळ मागितल्याने हनुमान कोळीवाडा मंदिरात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ, पुनर्वसन कमिटी यांची तातडीने बैठक झाली. या बैठकीत १ डिसेंबर रोजी होणारे आंदोलन दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी ठेवण्याचे एकमत झाले. तसा निर्णयही जाहीर करण्यात आला. त्यामुळे हनुमान कोळीवाड्याचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. ३७ वर्षे लढा, संघर्ष केला असता आता कुठेतरी प्रशासनातर्फे हालचाल होऊ लागली आहे. मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची जर शासनाने फसवणूक केली तर २६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा, पुनर्वसन कमिटीने प्रशासनाला दिला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *