येवल्यासाठी बाभूळगाव येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निवासस्थान बांधकाम करणे व या रुग्णालय परिसरात संरक्षक भिंत, काँक्रिट रस्ता, अग्नीप्रतिबंधक उपाययोजना, सांडपाणी व्यवस्था, पावसाचे पाणी साठवण व अनुषंगिक कामांचे भूमिपूजन
नाशिक, दि. ७ : येवला शहरातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान बांधकाम व आरोग्य व रुग्णालय सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुषंगिक सुविधांची कामे केली केली जाणार आहेत. यामुळे नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
येवल्यासाठी बाभूळगाव येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निवासस्थान बांधकाम करणे व या रुग्णालय परिसरात संरक्षक भिंत, काँक्रिट रस्ता, अग्नीप्रतिबंधक उपाययोजना, सांडपाणी व्यवस्था, पावसाचे पाणी साठवण व अनुषंगिक कामांचे भूमिपूजन मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किरण जाधव, हरीश जागळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत सोनवणे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
या कामांचे झाले भूमिपूजन
- १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय येवला निवासस्थाने बांधकाम (र.रु.१४०४ लक्ष)
- १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय येवला सांडपाणी व्यवस्था, संरक्षण भिंत, कॉक्रीट रस्ता (र.रु.१५० लक्ष)
- येवला तालुका क्रीडा संकुल अतिरिक्त बांधकाम-(र.रु.३०० लक्ष)
- येवला महसूल अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने इमारत बांधकाम भूमिपूजन (र.रु.६५१ लक्ष)