Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रत्नागिरीचा चैतन्य परब आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत देशात दुसर

आकाशवाणीच्या विशेष समारंभात होणार सत्कार नवी दिल्ली: रत्नागिरीच्या चैतन्य परब या बाल कलाकाराने आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन (ख्याल गायन) स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. १७ डिसेंबर रोजी  दिल्ली येथे आकाशवाणीच्या  विशेष समारंभात चैतन्यला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या वतीने दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे देश पातळीवर आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात झालेली प्राथमिक फेरी यशस्वी पार पडून चैतन्यची  दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या अंतिम फेरीसाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी केंद्रातून स्पर्धक दाखल झाले होते. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकित शर्मा याची प्रथम तर रत्नागिरीच्या चैतन्य परब ची  द्वितीय क्रमांकासाठी निवड केली. चैतन्य हा रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. चैतन्यने संगीताचे सुरूवातीचे शिक्षण त्याची आई  विनया परब यांच्याकडे घेतले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच त्याने मंडळाची हार्मोनियममधील मध्यमा प्रथम ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. चैतन्य सध्या गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे. Read more »

‘क्यार’ चक्रीवादळ झाले ‘अतितीव्र’; महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला मोठा धोका

‘क्यार’ चक्रीवादळ झाले ‘अतितीव्र’; महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीला मोठा धोका तीव्र चक्रीवादळ ‘क्यार’ च्या तीव्रतेत वाढ होवून ते आता एक अति तीव्र चक्रीवादळ बनले आहे. आज, पहाटे ५:३० वाजता, चक्रीवादळ मध्य-पूर्व अरबी... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनाने राजन साळवींना तारले, पण पक्षांतर्गत विरोधकांमुळे झाले गेल्या वेळेपेक्षा मताधिक्य कमी

नाणार प्रकल्प विरोधी आंदोलनाने राजन साळवींना तारले, पण पक्षांतर्गत विरोधकांमुळे झाले गेल्या वेळेपेक्षा मताधिक्य कमी रत्नागिरी: आधी जैतापूर आणि नंतर नाणार प्रकल्पामुळे वादग्रस्त ठरलेल्या राजापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राजन साळवी यांनी सलग... Read more »
Featured Video Play Icon

चिडलेल्या नाणार प्रकल्पविरोधी ग्रामस्थ महिलांनी मुख्यमंत्र्यांना दिली गाढवाची उपमा

चिडलेल्या नाणार प्रकल्पविरोधी ग्रामस्थ महिलांनी मुख्यमंत्र्यांना दिली गाढवाची उपमा Read more »

राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी?; मातोश्री भेटीनंतर चर्चांना उधाण

राष्ट्रवादीचे आ. भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी?; मातोश्री भेटीनंतर चर्चांना उधाण मुंबई/रत्नागिरी: राष्ट्रवादीतून आऊट गोइंग चा सिलसिला काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. बीड येथील आमदार जयदत्त क्षीरसागर, मुंबईतील सचिन आहेर, चित्रा... Read more »

मुसळधार बरसत पावसाने केलं श्रावणाचं स्वागत; मुंबई, ठाणे जलमय

मुसळधार बरसत पावसाने केलं श्रावणाचं स्वागत; मुंबई, ठाणे जलमय मुंबई: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड विभागात काल रात्रीपासून पावसाची कोसळधार चालू आहे. सकाळी घराबाहेर पडल्यावर रस्त्यावर साचलेल्या... Read more »

मॉन्सूनपूर्व पावसाने मुंबई शहर व कोकण किनारपट्टीला केले खुष

मॉन्सूनपूर्व पावसाने मुंबई शहर व कोकण किनारपट्टीला केले खुष मुंबई: प्रचंड उकाडा आणि घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबई व कोकण किनारपट्टीवरील लोकांना काल रात्री मॉन्सूनपूर्व पावसाने हॅपी मॉन्सून केलं. विजांच्या कडकडाटात हजेरी... Read more »

महाराष्ट्रात पारा आणखी वाढला

महाराष्ट्रात पारा आणखी वाढला महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी कोरडय़ा हवामानात वाढ झाल्याने गेल्या आठवडय़ापासून उष्णतेची लाट प्रसरत आहे. हवामानाच्या कोरडय़ा स्थितीमुळे तापमान कायम राहणार असून, विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान... Read more »

आज होलिकोत्सव, जाणून घ्या या सणाबद्दल 

आज होलिकोत्सव, जाणून घ्या या सणाबद्दल  होळी :  होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला “होळी पौर्णिमा” असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव... Read more »