Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

माजी मंत्री राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी

माजी मंत्री राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांची शिवसेनेत घरवापसी

मुंबई/गुहागर: गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे कोकणातील नेते भास्कर जाधव यांनी आज मातोश्रीवर हातावर शिवबंधन बांधत अखेर शिवसेनेत घरवापसी केली.

सकाळी भास्कर जाधव यांनी औरंगाबाद येथे हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यानंतर दुपारी थेट मातोश्री गाठत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना ही लढायांची सेना आहे. शिवसेनाप्रमुखांनाही तुमच्या लढवय्या असण्याचं कौतुक होतं. पुढे ते म्हणाले की लढवय्या शिवसैनिक आपल्या घरात पुनः येत आहेत शिवसैनिकांना याचा आनंद आहे.