Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ९३७२२३६३३२ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

शिवसेनेने घडविला इतिहास; कलाबेन डेलकर यांच्या रूपाने लाभल्या राज्याबाहेरील पहिल्या खासदार

दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांच्याकडून भाजप उमेदवार महेश गावित यांचा ५१ हजारांच्या मताधिक्याने पराभव

दादरा-नगर हवेली, दि.२: दादरा नगर हवेलीत लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवार महेश गावित यांचा ५१ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे. शिवसेनेच्या इतिहासात राज्याबाहेर लोकसभेची निवडणूक जिंकण्याची किमया डेलकर यांच्या विजयाने साधली आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर कलाबेन डेलकर यांनी हातावर शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप देखील केले होते. मतमोजणीच्या २४ व्या फेरीअखेरपर्यंत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना एक लाख १७ हजार ५९० मते मिळाली. तर, प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे महेश गावित यांना ६६ हजार ६१० मते मिळाली.

आजच्या विजयानंतर आदित्य ठाकरे यांनी तात्काळ ट्वीट केले. ते म्हणले की, “दादरा नगर हवेलीत आज भगवा फडकला. लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीमती कलाबेन डेलकर जी यांचा विजय निश्चितच एका नव्या विकास पर्वाची नांदी आहे. अन्याय आणि हुकूमशाही विरुद्ध जनतेने दिलेला हा कौल असून आता जनतेच्या हितासाठी दिल्लीत शिवसेनेचा आवाज आणखी बुलंद होईल, हा विश्वास आहे.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *