Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सहाय्यक निबंधक संध्या बावनकुळे यांच्याकडून वरळीस्थित गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष-खजिनदारांवर कठोर कारवाई

वरळीस्थित परेल सह्याद्रि एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष व खजिनदारांना पुढील ५ वर्ष संस्थेची निवडणूक लढवण्यास बंदी

मुंबई, दि.३: मुंबईतील वरळीस्थित परेल सह्याद्रि एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मागील काही वर्षांपासून कधी विकासक व कॉंग्रेस नेता रईस लष्करीया (Rais Lashkaria) याच्या घोटाळेबाजीमुळे तर कधी एसआरए SRA अधिकार्‍यांच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवाशांना झालेल्या त्रासामुळे चर्चेत राहिली आहे. परंतु यावेळी मात्र प्रकरण जरा वेगळं आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण(SRA)च्या आखत्यारीत येणार्‍या सहकारी संस्था निबंधक कार्यालयाकडे परेल सह्याद्रि एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सचिव विश्वनाथ शिंदे Vishwanath Shinde यांनी गृहनिर्माण संस्थेत चालणार्‍या अनागोंदी बाबत तक्रार केली होती. यात प्रामुख्याने त्यांनी या संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव Ashok Jadhav व खजिनदार इकबाल सय्यद Iqbal Sayyad यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. याच तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखेर सहाय्यक निबंधक संध्या बावनकुळे Sandhya Bawankule(सहकारी संस्था, मुबई शहर:झोपूप्रा) यांनी कठोर भूमिका घेत अध्यक्ष अशोक जाधव व इकबाल सय्यद यांना पुढील ५ वर्षांसाठी या गृहनिर्माण संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे.

आदेशाची प्रत :

या सार्‍या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ने सदर गृहनिर्माण संस्थेचे सचिव विश्वनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले की अखेर सत्याचा विजय होण्यास उशिरा का होईना सुरुवात झालेली आहे. संस्थेचे कामकाज महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अधिनियमाप्रमाणे चालणे गरजेचे होते. सन २०१८-२०१९ ची सर्वसाधारण सभा घेतली गेली नव्हती याच सोबतीला सन २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षांचे लेखापरीक्षणही करण्यात आलेले नव्हते. संस्थेच्या अध्यक्ष व खजिनदाराने केलेले हे सारे नियमबाहय उद्योग मी सहाय्यक निबंधकांच्या नजरेस आणून दिले व या सार्‍यांची त्यांनी योग्य वेळी दखल घेतली. यासाठी मी त्यांचा आभारी आहे. पुढे शिंदे म्हणाले की या जोडगोळीने आणखी अनेक घोटाळे केले असून विकासक रईस लष्करीया याला त्यांनी गृहनिर्माण घोटाळ्यात मदतही केलेली आहे. त्याशिवाय रईस लष्करीया याला हे सारे करणे शक्यही झालेले नाही. येत्या काळात आपण महाराष्ट्र वार्ता च्या लीगल टीम च्या मदतीने विकासक रईस लष्करीया सह त्याच्या पिलावळीचे आपण आणखी घोटाळे बाहेर काढू असेही ते शेवटी म्हणाले.

एसआरए सहकार विभाग हा गेल्या अनेक वर्षांपासून अवैध नोंदणी पासून अनेक गोष्टींमुळे बदनाम झाला असून या विभागाच्या आधीच्या अधिकार्‍यांना निलंबितही करण्यात आलेले आहे. २०२० साली सहाय्यक निबंधक (मुंबई शहर) या पदि रुजू झालेल्या संध्या बावनकुळे या एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. या प्रकरणात दोन्ही बाजूंचा प्रतिवाद झाल्यावर अनाठायी वेळखाऊपणा टाळून त्यांनी योग्य निर्णय विहित वेळेत दिल्याचे स्पष्ट दिसते आहे. हाच कित्ता मुंबई, ठाणे, नवी मुंबई व रायगड विभागातील सहाय्यक निबंधकांनी गिरवल्यास सहकारी गृहनिर्माण संस्थांची थकीत प्रकरणे न्यायालयांपर्यंत जाण्याची वेळच येणार नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *