Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या पुष्कराज पाठक Pushakaraj Pathak सह एकूण १० आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुण्यातील भारतीय कला प्रसारिणी सभेची कोट्यवधी रुपयांची जमिन लाटण्यासाठी बनावट सहीच्या आधारे व धर्मादाय आयुक्त(पुणे) येथील अधिकार्‍यांच्या संगनमताने संस्था ताब्यात घेण्याचा धक्कादायक प्रकार उघड

पुणे, दि. २१: पुण्यातील Pune भारतीय कला प्रसारिणी सभा या प्रख्यात शिक्षण संस्थेचे वादग्रस्त सचिव पुष्कराज पाठक Pushkaraj Bhalchandra Pathak  यांच्यासह एकूण १० जणांविरुद्ध काल दिनांक २०/१२/२०२२ रोजी स्वारगेट पोलिस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संस्थेचे विश्वस्त अनिल सूर्यकांत देसाई यांनी सदर प्रकरणी तक्रार नोंदवली होती. आपल्या तक्रारी मध्ये त्यांनी पुष्कराज पाठक व इतर आरोपींनी संगनमत करत भारतीय कला प्रसारिणी सभा संस्थेचे माजी सचिव मयत भालचंद्र पाठक यांच्या बनावट सह्या करत सह-धर्मादाय आयुक्त कार्यालयात संस्थेवर ताबा मिळवण्याच्या हेतूनं काही कागदपत्र जमा केली होती, असा आरोप केला आहे. अवैधरित्या संस्थेवर ताबा मिळवत त्यांनी संस्थेच्या मालकीची पाषाणरोड येथील कोट्यावधी रुपये किमतीची जमीन विक्री करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर इच्छुक खरेदीदाराकडून आरोपी पुष्कराज पाठक याने टोकन ची रक्कम घेतल्याची कुणकुण लागल्यामुळे संस्था वाचविण्याच्या हेतूने विश्वस्त अनिल देसाई Anil Desai व सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे Manisha Dharne यांनी पोलिसांत धाव घेतली. पुण्यातील भारतीय कला प्रसारिणी सभेचे टिळक रोड व पाषाण येथे अभिनव कला महाविद्यालय हे कलेचे व वास्तुविद्या संबंधीचे राज्यसह देशातील नामांकित असे महाविद्यालय आहे.   

 स्वारगेट पोलीस स्थानकात विश्वस्त अनिल देसाई यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, सन २००७ मध्ये संस्थेचे माजी सचिव मयत भालचंद्र पाठक यांच्या ४१अ अर्जानुसार तत्कालिन सह-धर्मादाय आयुक्त(पुणे) यांनी संस्थेचा एकतर्फी कार्यभार त्यांच्याकडे सोपवला होता. सन २०१५ पासून भालचंद्र पाठक यांना वयोपरत्वे तसेच विविध आजारांमुळे संस्थेच्या कामकाजावर पूर्णवेळ देखरेख ठेवणे शक्य नव्हते. तसेच आजारपणासोबत जर्जर शरीरामुळे त्यांना कोणत्याही कागदपत्रांवर हस्ताक्षर करणेही शक्य नव्हते. नेमक्या याच संधीचा फायदा घेत मयत भालचंद्र पाठक यांचा मुलगा आरोपी क्रमांक एक पुष्कराज पाठक व त्यांच्या कुटुंबातील इतर सात व्यक्तींनी आपआपसात संगनमत करून ‘भारतीय कला प्रसारिणी सभा’ या संस्थेची कोट्यवधी रुपयांची स्थावर मिळकत लाटण्याच्या हेतुने रुग्णालयात उपचार घेत असलेले भालचंद्र पाठक यांची बनावट सही करून तत्कालीन सह-धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडून बेकायदेशीररित्या स्वतःची सचिव व आपल्या कुटुंबातील व्यक्तींसह इतर मिळून एकूण १८ जणांची नावे आश्रयदाता सभासद म्हणून मंजूर करून घेतली. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे सदर १८ आश्रयदाते सभासद मंजूर करून घेते समयी अर्ज दाखल करताना आवक रजिस्टर मध्ये नोंद न करता, कोणतीही पडताळणी न करता झेरॉक्स प्रतींच्या आधारे पुष्कराज पाठक याने हा निकाल तत्कालीन सह-धर्मादाय आयुक्त यांच्याकडून मिळवला होता असे आता उघड झाले आहे. स्वारगेट पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआर नुसार संस्थेचे स्वयंघोषित सचिव आरोपी पुष्कराज पाठक यांनी त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना संस्थेचा कार्यभार हातात घेऊन संस्थेची व शासनाची फसवणूक केल्याचे दिसते. आरोपींमध्ये पुष्कराज पाठक यांच्या सोबतीने आरती भालचंद्र पाठक, क्रांती भालचंद्र पाठक, पद्मा भालचंद्र पाठक, अश्विनी अ. पाठक, पूनम अ. पाठक, जयदीप विठ्ठलराव लडकत, रामचंद्र पिसे, गौरव दिवेकर, कांतीलाल ठाणगे आदींची नावे नमूद आहेत. यातील जयदीप लडकत हा भारतीय कला प्रसारिणी सभेचा माजी अध्यक्ष असून त्याच्या विरोधात बनावट सह्यांच्या आधारे आपल्या जन्मदात्या पित्याची व सख्ख्या भावाची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्या संबंधी २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात वानवडी पोलीस स्थानकात दखलपात्र गुन्हयाची नोंद झाली आहे.

भारतीय कला प्रसारिणी सभा ही संस्था गेली अनेक वर्षे या न त्या वादांमुळे सतत चर्चेत राहिली आहे. या काळात संस्थेतील अनियमितता चव्हाट्यावर आणण्यात सामाजिक कार्यकर्त्या मनीषा धारणे यांनी वेळोवेळी महत्वाची भूमिका बजावली आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय कला प्रसारिणी सभा संचालित अभिनव कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राहुल बळवंत उर्फ राहुल कोळी यांनी नोकरीस रुजू होतांना संस्थेकडे व त्यामार्गे कला संचालनालयाकडे बनावट जात वैधता प्रमाणपत्र जमा केल्याचा आरोप मनीषा धारणे यांनी केला होता व या संबंधी ची तक्रार राज्याच्या कला संचालनालयाकडेही केली होती. या संबंधी महाराष्ट्र वार्ता च्या शोधपत्रकारीता विभागानेही काही महत्त्वाचे मुद्दे बातमीद्वारे उपस्थित केले होते. आज या प्रकरणी तक्रार करून जवळपास पाच महीने उलटून गेले तरी विद्यमान कला संचालक व अभिनव कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी विश्वनाथ साबळे यांनी त्यांच्या(कला संचालनालयाच्या) रेकॉर्ड मध्ये उपलब्ध असलेल्या राहुल बळवंत उर्फ राहुल कोळी याच्या बनावट जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी जात वैधता पडताळणी समितीकडे अद्याप केलेली नाही असे कळते. या प्रकरणातही संस्थेचा स्वयंघोषित सचिव पुष्कराज पाठक याने स्वतःच एक अवैध विश्वास्तांची समिती नेमून राहुल बळवंत उर्फ राहुल कोळी यांची उघडपणे बाजू घेत त्यांना क्लीनचिट दिली आहे व उलटपक्षी तक्रारदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मनीषा धारणे यांनी केला आहे. 

Crime! पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याचा मनीषा धारणे यांचा गंभीर आरोप

या प्रकरणातही संस्थेचा स्वयंघोषित सचिव पुष्कराज पाठक याने राहुल बळवंत उर्फ राहुल कोळी यांची उघडपणे बाजू घेतली होती व उलटपक्षी तक्रारदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप मनीषा धारणे यांनी केला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, “गेल्या अनेक वर्षांपासून संस्थेच्या रेकॉर्ड मधून महत्वाची कागदपत्रे गायब केली जात आहेत. त्या आधारे  आर्थिक घोटाळे होत असून ऑडिट नावाचा प्रकार हा नावाला तरी केला गेलाय का याचीही शंका येते. येथील शिक्षकांवर दबाव टाकून वेळोवेळी त्यांच्याकडून अवैध गोष्टींसाठी पाठिंबा मिळवण्याचा प्रकार पुष्कराज पाठक याच्याकडून केला जात असतो. संस्थेवर कोणताही वैध अधिकार नसताना पुष्कराज पाठक संस्थेच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनीचे व्यवहार बिनधोकपणे करत असून त्याचाही पर्दाफाश एका वृत्तपत्रात जाहीर झालेल्या नोटीस मुळे झाला. या साऱ्याला पुण्यातील सह-धर्मादाय आयुक्त कार्यालयातील तत्कालीन अधिकारी कारणीभूत असून त्यांनी वेळीच पुष्कराज पाठक व इतरांवर कारवाई करून त्यांना हटवले असते तर संस्थेवर नामुष्कीची अशी वेळ आली नसती असेही मनीषा धारणे पुढे म्हणाल्या. या सार्‍या अनियमिततेसंबंधी आपण पुणे सह-धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला पण तेथूनही थंडच प्रतिसाद लाभला. अखेर आपण महामहीम राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भेट घेत त्यांच्याकडे दाद मागितली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता त्यांनीही याची तात्काळ दखल घेत या प्रकरणी संस्थेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे निर्देश पोलिस महासंचालक(महाराष्ट्र राज्य), जिल्हाधिकारी पुणे, सहआयुक्त अनुसूचीत जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद यांना दिले असल्याचे मनीषा धारणे यांनी सांगितले.

पुण्यातील ‘भारतीय कला प्रसारिणी’ सभेचा अध्यक्ष जयदीप लडकत याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

सदर विश्वास्तांवर २००४ साली ४१ डी चा अर्ज सह धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात प्रलंबित होता. तसेच सदर विश्वास्तांची कायदेशीर मुदत (घटनेप्रमाणे) २००५ साली संपली असताना मयत भालचंद्र पाठक यांना संस्थेचा कार्यभार कोणत्या आधारावर सोपवला? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. संस्थेच्या घटनेतील नियमांची पायमल्ली करून २०१८ साली पुष्कराज पाठक यांनी मयत भालचंद्र पाठक यांच्या खोट्या सह्या करून सह धर्मादाय आयुक्त(पुणे) यांच्याकडून बोगस सभासद यादी मंजूर करून घेतली. त्याची देखील नव्याने चौकशी करून कागदपत्रांची फेरतपासणी करणे गरजेचे आहे. या सोबत ही बोगस यादी व इतर कागदपत्रे मंजूर करण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील ज्या तत्कालीन अधिकारी व लिपिक यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी व्हावी व दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे असे मनीषा धारणे शेवटी म्हणाल्या.
पुण्यातील नामांकित अशा अभिनव कला महाविद्यालयाचा कारभार हाकणार्‍या व १०० वर्षांपूर्वी ज्या संस्थेची बीज रोवली गेली अशा भारतीय कला प्रसारिणी सभेची झालेली दुर्दशा याला जबाबदार नेमकं कोणाला धरावं हा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतो. या ठिकाणी राजरोसपणे घोटाळे चालू असताना धर्मादाय आयुक्त कार्यालय व कला संचालनालय यावर आळा घालण्यात नक्कीच कमी पडले आहे यात आमचे दुमत नाही.
    
Pushakaraj Pathak, Arati Bhalchandra Pathak, Kranti Bhalchandra Pathak, Padma Bhalchandra Pathak, Ashwini A Pathak, Poonam A Pathak, Jaydeep Ladkat, Ramchandra Pise, Gaurav Diwekar, Kantilal Thanage, Maharashtra Varta, Maharashtra Warta, महाराष्ट्र वार्ता
     

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *