Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुण्यातील ‘भारतीय कला प्रसारिणी’ सभेचा अध्यक्ष जयदीप लडकत याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

जन्मदात्या पित्याची व सख्ख्या भावाची त्यांच्या खोट्या सह्या करत केली १ कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक

पुणे, दि.२३: एकाच घरात, एकाच छपराखाली राहून सख्ख्या भावाची फसवणूक केल्याचं प्रकरण पुण्यात समोर आलं आहे. वानवडी परिसरात राहणारे जयदीप विठ्ठल लडकत Jaydeep Vithhal Ladkat याने कागदपत्रांवर खोट्या सह्या करत आपले वडील विठ्ठल लडकत व सख्खे बंधू प्रसन्न विठ्ठल लडकत यांची १ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली असून या संदर्भात जयदीप लडकत याच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी वानवडी पोलीस स्थानकात नोंद झालेल्या FIR नुसार मार्च २०२० पासून जयदीप लडकत याने आपल्या वडिल व भावाच्या वेळोवेळी खोट्या सह्या करत आडीबीआय बँक वानवडी शाखेतून १ कोटी रुपये काढत मोठी आर्थिक फसवणूक केली. विठ्ठल लडकत, जयदीप लडकत व प्रसन्न लडकत यांची लीफ हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून हे सारे घोटाळे याच कंपनीच्या व्यवहारात झाले आहेत. जयदीप लडकत हा पुण्यातील सुप्रसिद्ध व तितक्याच वादग्रस्त अशा ‘भारतीय कला प्रसारिणी सभा’ Bhartiya Kala Prasarini Sabha (अभिनव कला महाविद्यालय) चा अध्यक्ष असून या संस्थेवर व येथील पदाधिकाऱ्यांवरही आर्थिक घोटाळ्याचे आरोप मागील काही वर्षांपासून सातत्याने होत आहेत. योगायोगाची गोष्ट अशी की याच संस्थेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक Pushkaraj Bhalchandra Pathak यांच्यावरही आपल्याच वडिलांची खोटी सही करून कोट्यावधी रुपयांचे चेक वटवल्याचे तसेच खोटे कागदपत्र धर्मादाय आयुक्त यांना सादर करून त्यांचीही फसवणूक केल्याचे गंभीर आरोप आहेत. सध्या या प्रकरणी उच्चस्तरीय सीआयडी चौकशी चालू आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी सर्व पुरावे उपलब्ध असतानाही एवढ्या काळात उचित कारवाई न केल्याचे प्रथम दर्शनी दिसते आहे. फसवणूक प्रकरणात जयदीप लडकत याच्यावर भा.दं.वि. च्या कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *