Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video: कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या महिलेचा मृतदेह न देणाऱ्या नानावटी हॉस्पिटलला नितीन नांदगावकरांचा दणका

Featured Video Play Icon

नांदगावकरांच्या तडाख्याने इस्पितळाने बिलाचे ५ लाख केले माफ

मुंबई: कोरोनाच्या संकटात सुद्धा काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूटमार चालूच आहे. अशीच एक तक्रार घेऊन एका तक्रारदाराने शिवसेनेचे अँग्री सुपरमॅन नितीन नांदगावकर यांना फोन केला आणि त्यानंतर या प्रकरणाचा नाट्यमय वळण आले.

या विषयाची पार्श्वभूमी अशी कि मुंबईतील नानावटी रुग्णालयात गेल्या बारा दिवसांपासून ऍडमिट राहिलेल्या एका महिला कोविड-१९ रुग्णाचा मृत्यू होतो. या महिलेच्या मुलाच्या हातात नानावटी रुग्णालय प्रशासन सात लाखांच बिल देतं. यातले दोन लाख यापूर्वी या रुग्णाच्या मुलाने भरलेले होते. आता उरलेले पाच लाख रुपये भरल्याशिवाय आम्ही रुग्णाचे पार्थिव नातेवाईकांच्या हवाली करणार नाही असा पवित्रा नानावटी रुग्णालय घेते. यावेळी उर्वरित बिल भरायचे पैसे नसल्यामुळे हवालदिल झालेला मुलाने हा सर्व घटनाक्रम रडत रडत नितीन नांदगावकर यांना सांगतला. त्यानंतर नांदगावकरांनी थेट आपल्या स्टाइलने रुग्णालयात प्रवेश करत रुग्णालय प्रशासनाला फैलावर घेतले. यावेळी त्यांनी अशा प्रकारे त्रस्त झालेल्या सर्व रुग्णांच्या व्यथा या प्रशासनासमोर मांडल्या. यावेळी नांदगावकर फार भडकलेले पाहायला मिळाले. हा सारा रागरंग पाहून अखेर नानावटी रुग्णालय प्रशासनाने या मृत महिलेच्या उपचारांचे बाकी असलेले पाच लाख रुपये तात्काळ माफ करत महिलेचे पार्थिव नातेवाईकांच्या हवाली सुपूर्द केले. यानंतर व्यथित झालेल्या नितीन नांदगावकर यांनी फेसबुक पोस्ट माध्यमातून आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, “मी कधीच श्रेय वादात पडत नाही फक्त गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो …..

हॉस्पिटलमध्ये येणारे बिल ( माफक ) हे प्रत्येकाने भरलेच पाहिजे यात दुमत नाही पण काही खाजगी हॉस्पिटलमध्ये लूटमार चालू असेल तर तेवढं बिल ह्या महामारीत कोणीच भरू शकणार नाही आणि भरू सुद्धा नये .
शेवटी माणुसकी महत्त्वाची पैसा काय कधी पण कमावता येईल ….

बस कोणीही गोरगरीब जनतेला वेठीस धरायचे नाही ……

खाजगी हॉस्पिटल मधला मनमानी कारभार खपून घेतला जाणार नाही !
सर्व डॉक्टरदेवदूतच ….. पण मॅनेजमेंटच्या दबावाला बळी पडतात हे सत्य नाकारून चालणार नाही .
असो महामारी आहे एकमेकांना समजून घ्या .
मॅनेजमेंटने वर्षानुवर्षे लाखो कोटी ह्याच मुंबईतील जनतेकडून कमावले आहेत हे विसरू नका.”

आजच्या या सर्व घटनाक्रमाबाबात माहिती जाणून घेण्यासाठी टीम महाराष्ट्र वार्ता ने नितीन नांदगावकरांशी थेट संपर्क साधला. यावेळी सदर घटनाक्रमाचा तपशील त्यांनी सांगितला. पुढे ते म्हणाले की अशाच प्रकारे मुंबईतील मेडिकल दुकानांत विकल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबतही येत्या काळात आपल्या स्टाईल ने ते ऍक्शन घेत या रॅकेट चा पर्दाफाश करणार आहेत. यात बनावट औषधं बनवणारे, डिस्ट्रिब्युटर, विक्रेते, याला साथ देणारे अधिकारी या साऱ्यांच्या काळ्या करतूतीचा बुरखा आपण फडणार आहोत असेही ते म्हणाले.

तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वार्ता ने अशाच प्रकारे नायर रुग्णालयातील एका मेडिकल मध्ये विकल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत बातमी प्रसारित केली होती. यात येत्या काही दिवसांत खळबळजनक असे वास्तव आम्ही सर्वांसमोर आणणार आहोत.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *