Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video || आगरी-कोळी-कराडी समाजाचे शक्तिप्रदर्शन; ठाकरे सरकारला इशारा

दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी आगरी-कोळी-कराडी समाजाचे साखळी आंदोलन

उरण, दि.१०(विठ्ठल ममताबादे): आज रोजी सकाळी नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे हृदयसम्राट, माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती तर्फे १० जून २०२१ रोजी मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी या आंदोलनाला आगरी-कोळी-कराडी समाजाचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

VIDEO पहा:

राज्य सरकारला गांभिर्याचा इशारा देण्यासाठी येथील प्रकल्पग्रस्त जनतेने स्वयंस्फुर्तीने रस्त्यावर उतरून उरण-पनवेल महामार्गावर मानवी साखळीचे आंदोलन केले. बोकडवीरा ते करळ-सावरखार दरम्यान उरण शहर, बोकडवीरा, पाणजे, डोंगरी, फुंडे, जे.एन.पी.टी टाऊनशिप, नवघर, कुंडेगाव, पागोटे, भेंडखळ, जसखार, करळ-सावरखार, सोनारी, जासई, दिघोडे, दास्तान फाटा, धुतूम, कोप्रोली, चिरनेर, पिरकोन, सारडे, खोपटा, गोवठणे, कळंबुसरे, करंजा, बोरी, मोरा, भवरा, केगाव, नागाव, मुळेखंड, चाणजे, नवीन शेवा आदी गावातील ग्रामस्थ उरण-पनवेल रस्त्यावर उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्त, कष्टकरी सर्व पक्षीय महिलांसहीत, युवा वर्ग, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर मानवी साखळीला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी, आगरी कोळी कराडी समाजाच्या विविध संस्था, संघटनांनी एकत्र येत शांततेने फिजिकल डिस्टन्स पाळून मास्क सॅनिटायझरचा वापर करून आपले साखळी आंदोलन यशस्वी करून सरकारचा निषेध केला. आंदोलनकर्त्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी या साखळी आंदोलनातून प्रशासनाकडे केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *