Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नमुमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते १० सेवानिवृत्तांचा एप्रिल महिन्यात सन्मान

नमुमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते १० सेवानिवृत्तांचा एप्रिल महिन्यात सन्मान

नवी मुंबई, दि. २: बदलत्या काळात आता निवृत्ती शब्दाचा अर्थही बदललेला असून आज निवृत्ती म्हणजे केवळ एका टप्प्यातून आपले दुस-या टप्प्यात स्थलांतर आहे. त्यामुळे जीवनाच्या या पुढच्या टप्प्यातही आपण कृतीशील राहून अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो असे सांगत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी एप्रिल महिना अखेरीस नवी मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून निवृत्त होणा-या १० अधिकारी, कर्मचारी यांना सन्मानीत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झालेल्या सेवानिवृत्ती समारंभाप्रसंगी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या समवेत अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त किसनराव पलांडे व चंद्रकांत तायडे, महापालिका सचिव
चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
आपले कष्ट व सचोटी ही मूल्ये महत्वाची असून आयुष्यातील सर्वात कृतीशील काळ आपण ज्या कार्यालयात व्यतित करतो त्याच्याशी आपलेले जुळलेले नाते जरी निवृत्तीमुळे संपुष्टात येणार असले तरी शहराविषयीच्या प्रेमातून आपण विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होऊन आपले सक्रिय योगदान देऊ शकतो असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. आपण आपल्या क्षेत्रात सतत अद्ययावत असले पाहिजे, विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत, त्याचा फायदा व्यक्तीगत विकासाप्रमाणेच संस्थेला व सर्वांनाच होते असेही मत त्यांनी व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नावलौकिकात येथील अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या चांगल्या कामाचा मोठा वाटा असल्याचेही ते म्हणाले.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या शुभहस्ते एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त होणारे अति. शहर अभियंता मनोज पाटील, लेखा अधिकारी हरिभाऊ खोसे, मुख्याध्यापक कल्पना गोसावी व जयश्री विधाटे, प्रशासकीय अधिकारी अंजली केणी, सहा. लेखा अधिकारी महेंद्रकुमार सोनावणे, आँक्झिलरी नर्स/मिडवाईफ पौर्णिमा परांजपे व गौरी केणी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनुसया खराडे, शिपाई विजय पाटील या अधिकारी, कर्मचारीवृंदाचा सन्मान करण्यात आला.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनीही सेवानिवृत्तीप्रसंगी शुभेच्छा देताना कामाप्रती बांधिलकी जपत सेवाभावी वृत्तीने आपण करीत असलेल्या कामाची नोंद निश्चितच घेतली जाते असे सांगत सेवानिवृत्त होणा-या अधिकारी, कर्मचा-यांना त्यांचे देय्य असलेले लाभ सेवानिवृत्तीच्या दिवशीच देण्याचे निर्देश आयुक्त महोदयांनी दिले असल्याची माहिती दिली व त्यादृष्टीने लगेच कार्यवाही सुरू झाली असल्याचे सांगितले.
शहर अभियंता संजय देसाई यांनी सेवानिवृत्त होणा-या प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्या स्वभावाची व कार्यशैलीची वैशिष्टयपूर्ण माहिती देत शुभेच्छा दिल्या. महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अति, शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे यांनीही याप्रसंगी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. अति. शहर अभियंता मनोज पाटील व लेखाधिकारी हरिभाऊ खोसे यांनी सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच सेवानिवृ्त्त होणा-या कर्मचा-यांचे कुटुंबियही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *