एल निनोच्या प्रभावामुळे यंदा देशात कमी पावसाचा अंदाज; महाराष्ट्रातील अनेक भागांवर दुष्काळाचे सावट
मुंबई, दि. २९ : यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असल्याने देशभरातील सरासरी पर्जन्यमान कमी राहील, असा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत हवामान खात्याने मान्सूनविषयीचा नवा अंदाज जाहीर केला. यापूर्वी एप्रिल महिन्यात देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नव्या आढाव्यानंतर हा अंदाज घटवून आता सरासरीच्या ९० टक्के पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या या अंदाजानंतर महाराष्ट्रातील पर्जन्यमानाबाबतही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी राज्यातील संभाव्य पावसाच्या परिस्थितीविषयी सविस्तर निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या मते, एल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांना कमी पावसाचा सर्वाधिक फटका बसू शकतो.
के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, जून महिन्यात एल निनोचा प्रभाव तुलनेने कमी असेल. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्याचा प्रभाव अधिक जाणवू लागेल, तर सप्टेंबर महिन्यात एल निनोचा प्रभाव सर्वाधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता असून शेती, पिण्याचे पाणी, ऊर्जा निर्मिती आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, सलग चार महिने कमी पाऊस झाल्यास जलसाठ्यांवर ताण वाढू शकतो. धरणांतील पाणीसाठा, भूजल पातळी आणि शेतीसाठी उपलब्ध पाण्यावर याचा
