Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Vinod Ghogale “ट्रॅक बदलला आणि जीवन बदललं….”

मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांना धमकी दिल्या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या विनोद घोगळे यांचे मनोगत

मुंबई, दि. ११: दिग्दर्शक अभिजीत पानसे यांचा ‘रेगे’ चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. या चित्रपटातील मुख्य पात्र असलेला ‘अनिरुद्ध रेगे’, भाईगिरी आणि भाईलोक यांच्या आकर्षणापोटी त्यांच्याशी दोस्ती करतो व पुढे याच कुसंगतीमुळे गोत्यात येतो. अशीच काहीशी फिल्मी पण रियल लाईफ स्टोरी विनोद घोगळे (साई) यांची आहे. परंतु त्यांच्या स्टोरी चा शेवट हा कडू न होता गोड असा झाला आहे. २०१३ साली विक्रोळीतील तत्कालीन मनसे आमदार मंगेश सांगळे(Mangesh Sangale)  यांनी गँगस्टर कुमार पिल्लई याच्यामार्फात आपल्याला फोन मार्फत खंडणीसाठी धमकी दिल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी रामदास राहणे व विनोद घोगळे (साई) (Vinod Ghogale) या आर्थररोड तुरुंगात आधीपासून अटकेत असलेल्या दोघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. परंतु कालांतराने मंगेश सांगळे व कुटुंबीयांनी कोर्टात आपली साक्ष फिरवल्यामुळे, अखेर दोन दिवसांपूर्वी मोक्का न्यायालयाने या तिघांची निर्दोष सुटका केली. या सबंध प्रकरणात घाटकोपर गुन्हे शाखेने आपली बाजू नेटाने धरून ठेवली होती हे विशेष.

या सर्व पार्श्वभूमीवर आमच्या स्थानिक प्रतिनिधीने या प्रकरणातून निर्दोष सुटलेले भाजपचे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे विद्यमान महाराष्ट्र उपाध्यक्ष विनोद घोगळे(vinod Ghogale) यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. आपण निर्दोष असल्यामुळे आज ना उद्या या प्रकरणातून मुक्त होऊ याची मला खात्री होती असे घोगळे म्हणाले. पुढे त्यांनी अखेर सत्याचा विजय झाला म्हणत मोक्का न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. यावेळी ते काही काळ भूतकाळात डोकावत म्हणाले की ऐन तारुण्याच्या भरात भाईगिरीच्या आकर्षणापोटी माझ्याकडून एक गुन्हा घडला याची आपण तब्बल ८ वर्षे शिक्षाही भोगली परंतु माझा पिंड हा बंडखोर असल्यामुळे कदाचित त्यावेळी आपण वाहत गेल्याचे घोगळे म्हणाले. पण त्या काळातही आपण विक्रोळीत अथवा मुंबईतील कोणत्याही सामान्य माणसास महिला अथवा बालकास त्रास होईल असे कोणतेच कृत्य केले नाही. ज्यावेळी मला जाणीव झाली की मी चुकीच्या ट्रॅकवर आहे त्यावेळी मी या साऱ्यातून बाहेर पडण्याचा दृढनिश्चय केला. हा काळ नक्कीच कठीण होता परंतु माझ्या आईवडिलांचे संस्कार, बायको श्रुती(Shruti Ghogale) हिची मोलाची साथ तसेच आप्तेष्ट व मित्रमंडळी यांच्या पाठिंब्यामुळे आजचे हे दिवस मला पाहायला मिळत आहेत.

पोलिसांबाबत बोलायचे झाले तर मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांनीही मला जीवनाचा गाडा योग्य दिशेने नेण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांचे ऋण मी या जन्मी तरी फेडू शकत नाही इतकं नक्की असे म्हणत त्यांनी या बाबत कृतज्ञता व्यक्त केली.

सध्या ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजकारणात सक्रिय असून मुंबईभर कोविड चा प्रादुर्भाव उच्चतम पातळीवर असताना विनोद घोगळे(Vinod Ghogale) यांनी विक्रोळी, वांद्रे, खार या परिसरात स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून अनेक दिवस निर्जंतुकीकरणाची(Sanitization) मोहीम राबविली होती. याची अनेक माध्यमांनी देखील दखल घेतली होती. येत्या काळात विक्रोळी विभागातील दिशा भरकटलेल्या तरुणांसाठी नियमित पणे करियर-नोकरी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे घोगळे शेवटी म्हणाले.

कोरोना संकटकाळात मदतीचा बाजार न मांडता थेट गरजवंतांना नेमकी मदत करणाऱ्या अवलियाचे होतेय सर्वत्र कौतुक

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *