Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कोरोना संकटकाळात मदतीचा बाजार न मांडता थेट गरजवंतांना नेमकी मदत करणाऱ्या अवलियाचे होतेय सर्वत्र कौतुक

कोरोना संकटकाळात मदतीचा बाजार न मांडता थेट गरजवंतांना नेमकी मदत करणारा अवलियाचे होतेय सर्वत्र कौतुक

मुंबई, दि.२६ : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांच्या आर्थिक नाड्या पूर्णपणे आवळल्या गेल्या आहेत. विशेषतः मध्यमवर्गाला व निम्न-मध्यमवर्गाला याची झळ जास्त बसतेय. हा वर्ग कोणाकडे शक्यतो मदतीसाठी स्वतःहून हात पसरत नाही की याला थेट कोणी राजकारणी दारात येऊन मदत करत. पण या अशा वर्गाला विक्रोळी पूर्व परिसरातील विनोद घोगळे(Vinod Ghogale) नावाचा एक संवेदनशील समाजसेवक गेल्या ३० दिवसांपासून अन्न दानाची व जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपातील मदत करत आहे.

याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांकडून असे कळले की हे कार्य करत असतानाचे कोणतेच फोटो त्यांनी फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकले नाहीत कारण अशा प्रकारे मदतीचा बाजार मांडला तर ज्याला ती मदत दिली जात आहे त्या व्यक्तीला कमीपणा वाटू शकतो व त्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो अशी घोगळे यांची धारणा आहे.

काल दि. २५ एप्रिल रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या अवलियाने एक नवा संकल्प केला आहे. यानुसार विक्रोळी परिसरातील गरजू गृह संकुलांत स्व खर्चाने व शासनाच्या परवानगीने ते सॅनिटायझेशन प्रक्रिया सुरू करणार आहेत.

अशा प्रकारे नेमकी व योग्यवेळची मदत नक्कीच आपणा सर्वांना कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी कामी येईल यात शंकाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साथ देऊन शक्य ती मदत आपण करू असे शेवटी विनोद घोगळे यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *