Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! : उद्धव ठाकरे

ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! : उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकीतील औरंगाबाद च्या पराभवाची सल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनात अजूनही आहे असेच म्हणावे लागेल. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मधील अग्रलेखात त्यांनी ओवेसी व त्यांच्या पक्षाला पुनः एकदा इशारा वजा धमकी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव मांडण्याच्या मुद्द्यावर एमआयएम च्या नगरसेवकांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. याच घटनेचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या आजच्या अग्रलेखात औरंगाबाद मधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे.

सविस्तर अग्रलेख पुढीलप्रमाणे

लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे. आपल्यातीलच एका खानाने हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल.

संभाजीनगरात हैदोस सुरू
…तर घरात घुसून मारू!
जेथे औरंग्यास गाडले किंवा पुरले त्या संभाजीनगरात हिरव्या विषाला पुन्हा उकळी फुटली आहे. महाराष्ट्रातच काय, संपूर्ण देशभरात हिंदुत्वाची लाट उसळली असताना लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरचा निर्णय विचित्र लागला. गेली 30 वर्षे संभाजीनगरवर डौलाने फडकणारा भगवा उतरवणारे हात आपल्यातल्याच सूर्याजी पिसाळांचे होते. हैदराबादच्या ओवेसी पक्षाचे इम्तियाज जलील विजयी झाले तेव्हाच संभाजीनगरच्या इतिहास, भूगोल आणि संस्कृतीस धक्का बसला. यापुढे काय घडणार आहे त्याचे प्रात्यक्षिक संभाजीनगर महापालिकेत गुरुवारी झालेल्या राड्यावरून स्पष्ट झाले. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘ओवेसी’ पक्षाच्या औरंगाबादी नगरसेवकांनी गोंधळ घातला. खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन प्रस्तावावरून हा राडा सुरू झाला. झोंबाझोंबी व राजदंड पळवून नेण्यापर्यंत प्रकरण पुढे गेले. ओवेसी पक्षाचा पालिकेतील नेता नासेर सिद्दिकी याचे वर्तन एखाद्या गुंडासारखे होते. त्याला व त्याच्या सोबत गुंडागर्दी करणाऱ्या नगरसेवकांना अक्षरशः उचलून आणि फरफटत बाहेर काढावे लागले. सभागृहात अभूतपूर्व गोंधळ लोकांच्या प्रश्नांवर किंवा राष्ट्रीय हिताच्या मुद्दय़ावर झाला नाही, तर जलील यांच्या अपघाती विजयाचे अभिनंदन करावे यासाठी होता. हा गोंधळ पाहून त्याच मातीत गाडलेला औरंगजेबही कबरीतून आनंदाने टाळ्या वाजवीत असेल व ज्यांच्यामुळे हा विजयी अपघात घडून संभाजीनगरवर हिरवा फडकला त्या ‘कन्नड’च्या खानासाठी अल्लाकडे दुवा मागत असेल. कन्नडच्या खानांसारखे खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ आमच्यातच निपजल्यावर धर्मांधांची विषवल्ली फोफावणारच. संभाजीनगरच्या महापालिकेत नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विजयी खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव येत असताना ओवेसी पक्षाचे मियाँ जलील यांचा

स्वतंत्र अभिनंदन
राव घ्यावा हा हट्ट कशासाठी? मुळात जलील व त्यांच्या पक्षाचे संभाजीनगरसाठी योगदान ते काय, हा प्रश्न आहेच. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्वाणानंतर नांदेड महापालिकेत शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रस्ताव आला तेव्हा औरंग्याच्या याच पिलाकळीने शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्यास विरोध केला होता. अर्थात त्यावेळी सभागृहातील शिवसेनेच्या बहाद्दर नगरसेवकांनी ओवेसीच्या बगलबच्च्यांना चांगलेच तुडवून काढले होते. 2014 मध्ये नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळीही त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावला याच एमआयएमच्या नगरसेवकांनी नांदेड महापालिकेत विरोध केला होता. तेव्हाही रणकंदन झालेच होते. इतकेच काय अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर संभाजीनगर महापालिकेत आलेल्या शोवप्रस्तावालाही विरोध करण्याचे पाप एमआयएमच्या एका नगरसेवकाने केले. एमआयएमच्या त्या विकृत नगरसेवकालाही शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी यथेच्छ चोपून काढले होते. हा तुमचा इतिहास आणि ही तुमची विकृत संस्कृती. शिवसेनाप्रमुख आणि वाजपेयी ही आमची श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळे त्यांच्या श्रद्धांजलीस विरोध करणाऱ्या विकृतीचे संभाजीनगरात स्वागत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! तेव्हा जलील यांच्यासाठी स्वतंत्र अभिनंदन ठरावाचा हट्ट करणाऱ्यांनी आमच्या मनातील पुढील शंकांचे निरसन करावे.
1) जलील यांनी आपण औरंगाबादचे नव्हे, तर संभाजीनगरचे खासदार आहोत हे मान्य करावे.
2) महापालिकेत ‘ओवेसी’ पक्षाच्या नगरसेवकांनी ‘वंदे मातरम्’चे सूर आळवावेत.
3) ट्रिपल तलाकबाबत मोदी सरकारने घेतलेल्या मानवतावादी भूमिकेस पाठिंबा द्यावा.
4) कश्मीरातील 370 कलम हटवणे, देशभरात समान नागरी कायदा लागू करणे अशा राष्ट्रीय मुद्दय़ांवर पाठिंबा द्यावा.
हे राष्ट्रीय मुद्दे असून त्यांस पाठिंबा देणाऱ्यांचाच अभिनंदन ठराव संभाजीनगर पालिकेत मंजूर होईल.

देशविरोधी भूमिका
घेणाऱ्यांचे अभिनंदन करणे हा देशद्रोह आहे. अशा देशद्रोहय़ांचे मनसुबे उधळून लावल्याबद्दल आम्ही महापौर नंदकुमार घोडेले व शिवसेना-भाजपच्या सर्व वाघांचे अभिनंदन करीत आहोत. संभाजीनगरात ओवेसी पक्षाचे खासदार विजयी होताच जो उन्माद सुरू झाला तो संतापजनक आहे. क्रांती चौकात मशिदीसमोर चटया पसरून रस्त्यावर नमाज पढण्याचे धंदे सुरू झाले आहेत. जणू निजामाचे किंवा औरंग्याचे राज्य पुन्हा अल्लाकृपेने अवतरले असा हैदोस सुरू झाला आहे. संभाजीनगरात शिवसेना ही सतत हिंदू हितरक्षकाच्या भूमिकेत वावरली. 1988 च्या भीषण दंगलीनंतर शिवसेना हिंदूंची कवचकुंडले बनली. हिंदूंवर होणारा प्रत्येक घाव शिवसेनेने स्वतःच्या छातीवर झेलला. जे हिंदूंच्या अंगावर आले त्यांना शिंगावर घेऊन आपटले. अर्थात, संभाजीनगरातील असंख्य राष्ट्रवादी मुसलमानांची साथ आम्हास लाभली व हे मुसलमान आजही भगव्याचे पाईक म्हणून आमच्या सोबतीला आहेत. लोकसभा निवडणुकीत एक निसटता पराभव अपघाताने झाला म्हणून संभाजीनगरचा हिंदू नामर्द बनलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या घरात घुसून अतिरेक्यांना मारले तेच आक्रमण आम्हालाही शक्य आहे. संभाजीनगरातील ‘औरंगाबादे’त घुसून औरंग्याच्या पिलावळीस ठेचून काढण्याची हिंमत हिंदूंच्या मनगटात आहे. हिंदूंच्या अंगावर येणाऱ्या सगळ्यासाठीच हा इशारा आहे. आपल्यातीलच एका खानाने भगवा खाली उतरवत स्वतःची सुंता करून घेतली. हाती हिरवे फडके बांधून त्याने औरंग्याच्या कबरीवर जरूर नमाज अदा करावेत, पण शिवसेना-भाजप युतीने आपला ‘धर्म’ सोडलेला नाही. संभाजीनगरच्या अस्मितेसाठी व हिंदूरक्षणासाठी शिवसेनेचा लढा चालूच राहील. ओवेसीछाप टोळक्यास उचलून बाहेर फेकल्याबद्दल संभाजीनगर महापालिकेचे अभिनंदन! हे काल घडले, उद्याही घडेल.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *