Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुंबईच्या किनाऱ्यालगत समुद्रातून मासेमारी नौका त्यातील चार कर्मचाऱ्यांसह भारतीय तट रक्षक दलाने घेतली ताब्यात;

३०,००० लीटर अवैध डिझेल आणि १.७५ लाख रुपये जप्त

मुंबई, दि. १३: भारतीय तट रक्षक दलाने १२ मे २०२४ रोजी नैऋत्य मुंबई पासून २७ सागरी मैलावर ‘आई तुळजाई’ नावाची मासेमारी नौका त्यावरील चार कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेतली. डिझेल तस्करी करणाऱ्या या  संशयित बोटीला भारतीय तट रक्षक दलाच्या वेगवान गस्ती नौका आणि इंटरसेप्टर नौकेने ही कारवाई केली.

ताब्यात घेतलेल्या नौकेचा अत्यंत बारकाईने तपास केला तेव्हा त्यात अंदाजे ३० लाख रुपये किंमतीचे सुमारे ३०,००० लिटर अवैध डिझेल सापडले. पकडलेले मासे ठेवण्याच्या टाक्यांमध्ये हे डिझेल लपवलेले होते. तसेच, १.७५ लाख रुपये बेहिशेबी रोकडही नौकेवरून जप्त करण्यात आली. नौकेवरून अटक केलेल्या कर्मचाऱ्यांनी बेकायदा माल संशय घेणार नाहीत अशा मच्छिमारांना विकण्याचा आपला बेत होता, अशी कबुली दिली.

May be an image of 11 people and boat

ताब्यात घेतलेली नौका भारतीय तट रक्षक दलाच्या मध्यस्थी नौकेने मुंबई बंदरात आणली. पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी तिथे ती सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. या बेकायदा कृत्याविरोधात समावेशी कायदेशीर कारवाई व्हावी या हेतुने इतर किनारा सुरक्षा विभाग जसे की पोलीस, मत्स्य विभाग आणि महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या प्रतिनिधींना सहभागी करून घेण्यात आले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *