Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘आरबीआय’ चा रेपो रेट सहा पूर्णांक पाच टक्यांवर कायम

‘आरबीआय’चं द्वैमासिक धोरण जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक आर्थिक पतधोरण जाहीर केलं. यामध्ये रेपो दर सहा पूर्णांक पाच टक्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. व्याज दरातही कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती, बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. स्थायी ठेव सुविधा अर्थात एसडीएफ दर सहा पूर्णांक २५ शतांश टक्के कायम ठेवला आहे. आधीच्या सहा पूर्णांक ७५ शतांश टक्यांचा सीमांत स्थायी सुविधा आणि बँक दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्राप्त मुल्यांकनानुसार २०२३-२४ मध्ये महागाई चार टक्क्यांच्या वर राहील तर सर्व घटकांचा विचार करुन चलनवाढ २०२३-२४ साठी पाच पूर्णांक एक दशांश टक्के राहण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी सांगितलं. आरबीआयनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून परत घेतल्यानंतर मे च्या तिसऱ्या आठवड्यापासून चलनातील घट आणि सरकारी खर्चात वाढ यामुळे प्रणालीतली तरलता वाढली आहे. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दोन हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्यामुळं या तरलतेत आणखी वाढ झाल्याचं ते म्हणाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक गेल्या सहा जून पासून मुंबईत सुरू होती. त्यानंतर आज द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर करण्यात आलं. आरबीआयनं दोन हजार रुपयांची नोट चलनातून परत घेतल्यानंतर आर्थिक धोरण समितीची झालेली ही पहिलीच बैठक होती.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *