Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मुंबईत १० जून रोजी आयोजन

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मुंबईत १० जून रोजी आयोजन

मुंबई, दि. ९: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्यातर्फे शनिवार १० जून २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या कालावधीत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त र. प्र. सुरवसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

सेंट ज्यूड हायस्कूल, इंदिरानगर, काजूपाडा, कुर्ला (प.), मुंबई- ४०००७२ येथे हा मेळावा होईल. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *