Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ९३७२२३६३३२ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

‘घरकुल एक्सप्रेस ग्लोबल’ Gharkool Express Global टीम वर पुणे पोलिसांकडून अद्याप कारवाई का नाही?

डॉ. पराग पवार, मोहन देठे व टीम ला गजाआड कधी करणार?

पुणे, दि.४ Updated ९: जवळपास ८ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वार्ता च्या टीम ने ऑपरेशन ब्लॅक मार्ट अंतर्गत पुणे येथील घरकुल एक्सप्रेस ग्लोबल(Gharkool Express Global) या घोटाळेबाज MLM कंपनीची पोलखोल केली होती. त्यावेळी टीम ने बातमीच्या माध्यमातून या सर्व बाबींकडे पुणे पोलीसांचे लक्ष वेधले होते. परंतू आज एवढे महिने उलटूनही या कंपनीचे प्रमुख डॉ. पराग पवार Dr. Parag Pawar व मोहन देठे Mohan Dethe या शिवाय त्यांच्या सोबत काम करणाऱ्या एजंट्स वर अद्याप कोणतीही कारवाई झाल्याचे दिसत नाही. उलटपक्षी या कंपनीचे काम अगदी जोमाने चालू आहे. नवनवीन कार्यालये थाटली जात आहेत व त्याच जोडीला कोट्यवधींची उलाढालही होत आहे.

या साऱ्याला पोलीस प्रशासनाचा अदृश्य पाठिंबा तर नाही ना अशी शंका येण्यास वाव आहे. कारण या कंपनीने नुकतीच नाशिक शहरात आपली एक शाखा उघडली असून या शाखेच्या उद्घाटनाला चक्क एका DYSP दर्जाच्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने विशेष उपस्थिती लावली होती व या संदर्भात एक निमंत्रण पत्रिका या कंपनीच्या एजंट ने व्हाट्सअप्पद्वारे महाराष्ट्र वार्ता च्या अधिकृत क्रमांकावर दबाव टाकण्याहेतू पाठविली होती. यावरून एक गोष्ट लक्षात येते की ही घोटाळेबाज मंडळी आणि पोलीस प्रशासनातील काही मंडळी यांचे एक नियोजनबद्ध अंडरस्टँडिंग असते. ज्याशिवाय असे घोटाळे होऊच शकत नाहीत.

पोलिसांकडून अशा घोटाळ्यांकडे होतेय डोळेझाक

मुळात कोणत्याही प्रकारे MLM/नेटवर्क मार्केटिंग च्या माध्यमातून व्यवसाय करण्यास कायद्याने बंदी असून त्याचे उंलंघन करणाऱ्यांवर “PCMC ऍक्ट १९७८”, भा.दं. वि च्या कलम ४२० व MPID ऍक्ट १९९९ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाईचे प्रयोजन आहे. शिवाय या अशा कंपन्यांत मासिक वेतनावर व सोबतच एजंट म्हणून काम करणाऱ्यांवरही भा.दं.वि. च्या कलम ४०९ व PCMC ऍक्ट अन्वये कारवाई होऊ शकते. आज या अशा प्रकारच्या घोटाळेबाज कंपन्या व त्यांच्या फसव्या स्कीम पासून लोकांचे रक्षण करण्यासाठी PCMC ऍक्ट सारखे कठोर कायदे आहेत परंतू त्याची अंमलबजावणी करण्याची इच्छा न राज्याच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे आहे न विभागनिहाय पोलिसांकडे. या साऱ्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा एखादा अपवाद वगळता इतर बाकी ठिकाणी तक्रार दाखल झाल्याशिवाय पोलीस प्रशासन स्वतःहून लक्षही घालत नाही. साधारण २०१९ च्या डिसेंबर महिन्यात नवी मुंबई चे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी “कॅपिटल ट्रेड’ नामक एका MLM कंपनीवर स्टिंग ऑपरेशन करत थेट धाड टाकली होती व जवळपास १७ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात समोरून कोणतीही अधिकृत तक्रार न येताही कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त कुमार यांनी स्वतःहून कारवाई करत या घोटाळेबाजांच्या वेळीच मुसक्या आवळल्या नाहीतर काही हजार कोटी रुपयांचा घोटाळा नक्की झाला असता.

या साऱ्या प्रकरणी महाराष्ट्र वार्ता येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदन देत MLM स्कीम व चॅरिटी च्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या घोटाळेबाज कंपन्या व त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लीडर्स व एजंट्स वर ‘मोक्का'(महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार आहे. शिवाय अशा घोटाळेबाजांना विदेशात जशी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते तशाच स्वरूपाची काठोर शिक्षा होण्यासंदर्भात कायदा पारित करण्याचीही मागणी येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्रातील खासदारांमार्फत केंद्र सरकारकडे करणार आहे.

घरकुल एक्सप्रेस ग्लोबल Gharkool Express Global सारख्या घोटाळेबाज कंपन्यांची तक्रार करण्यासाठी आपण पुढील ई-मेल id वर मेल करून पोलीस विभागास माहिती देऊ शकता.

ईडी (सक्तवसुली संचालनालय) : 1) dir-enforcement@nic.in 2) ed-del-rev@nic.in 3) dla-ed-enforcement@nic.in

पुणे पोलीस आयुक्त : cp.pune@nic.in

पुणे शहर आर्थिक/Cyber गुन्हे DCP : dcpcyber.pune@nic.in

CC to राज्य अति. पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे : adg.eowms@mahapolice.gov.in

मागील आठवड्यात भांडाफोड केलेल्या डी-मनी D-Money कंपनीसंदर्भातील बातमी पुढील लिंक वर क्लीक करून वाचू शकता.

डी-मनी D-MONEY घोटाळा! १००० रुपयांत करोडोंची स्वप्न दाखवणाऱ्या अनिल महिवाल आणि कंपनीला बेड्या कधी?

आपल्याकडेही अशाच प्रकारे सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची माहिती असेल तर आपण आम्हाला news@maharashtravarta.com वर ई-मेल द्वारे व 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे पुराव्यानिशी कळवू शकता.

लिंक क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

 

Gharkulexpressglobal Gharkul express Vandana Shinde Chandrashekhar Bhad #Vandanashinde #Chandrashekharbhad

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *