Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डी-मनी D-MONEY घोटाळा! १००० रुपयांत करोडोंची स्वप्न दाखवणाऱ्या अनिल महिवाल आणि कंपनीला बेड्या कधी?

शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी महाराष्ट्र वार्ता कडून घेतली प्रकरणांची सविस्तर माहिती; लॉकडाऊन नंतर सुरु करणार ‘ठोक’ मोहीम 

कमी गुंतवणुकीत व कमी कष्टांत जास्त पैसे कमावण्याच्या लालसेपोटी मोठी फसवणूक झाल्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रांत रोज वाचत असतो. परंतू या बाजारात काही असेही ठग आहेत ज्यांच्या स्कीम मध्ये पैसे गुंतवून फसगत झाल्यावर पीडित पोलिसांत तक्रार देण्याची तसदीही घेत नाहीत. कारण गुंतवणुकीचा आकडा हा फारच छोटा असतो. महाराष्ट्र वार्ता ने  ऑपरेशन ‘ब्लॅक मार्ट’ जानेवारी महिन्यात पुणे स्थित ऑसमॉस टेकनॉलॉजि प्रा. लि.Osmose Technology Pvt. Ltd. या कंपनीने केलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. अगदी त्याच पद्धतीने आणि त्याच काळात बदलापूर, ठाणे व नवी मुंबई स्थित ‘तारेक इन्फोटेक (इंडिया) लिमिटेड’Tarek Infotech (India) Limited कंपनीने dmoney.uk व आणखी एका वेबसाईट्स च्या माध्यमातून देशातील लाखो लोकांना मोठा चुना लावला आहे. या कंपनीची स्कीम अगदी साधी आणि सोप्पी होती. ती म्हणजे आमच्याकडे १००० रुपये गुंतवा आणि १०० दिवसांपर्यंत दिवसाला ५० रुपये मिळवा. या स्कीम च्या मोहात अडकून लोकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. सुरुवातीला लोकांना पैसे आलेहि परंतु नंतर इतर MLM/Money Circulating स्कीम प्रमाणे यांनीही आपले रंग दाखवायला सुरुवात केली. या कंपनीने आमचे मोबाईल ऍप येत असून गुंतवणूकदारांना फक्त २० दिवस थांबण्याची विनंती केली. गेले ४ महिने हाच मेसेज कंपनीच्या वेबसाईट वर असून हे २० दिवस अद्याप संपलेले नाहीत. ऑसमॉस टेकनॉलॉजि घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यावर या कंपनीच्या कारनाम्यांची माहिती आम्हाला एका गुंतवणूकदाराकडून मिळाली. 

मुळात पोलीस आदी यंत्रणांनी वेळीच योग्य पावलं उचलली तर या घोटाळेबाजांना आपले हात पाय पसरवायला वेळही मिळणार नाही. आज ‘ईडी’ व ‘सीबीआय’ सारख्या सक्षम केंद्रीय यंत्रणा असूनही त्यांचे या घोटाळ्यांकडे लक्ष जात नाही हि मोठी शोकांतिका म्हणावी. शिवाय हे सर्व घोटाळे आर्थिक सोबतच सायबर गुन्हे(Cyber Crime) सदरात मोडत असून राज्य व केंद्राच्या सायबर क्राईम विभागाने मनात आणले तर या वेबसाईट्स वर वेळीच बंदी आणून पुढील आर्थिक अनर्थ टाळता येऊ शकतो.

ऑसमॉस प्रमाणे ‘डी मनी’ घोटाळ्यातही २० लाखांपेक्षा जास्त लोकांनी गुंतवणूक केल्याची प्रथम दर्शनी माहिती आमच्या टीम च्या हाती आली आहे. म्हणजेच जवळपास २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल या प्रकरणात झाली असून याकडे विक्री आणि सेवा कर(GST) विभागाचे लक्ष गेले नाही ही बाब आश्चर्यकारक वाटते.

हा घोटाळा ज्या कंपनीने केला आहे ती तारेक इन्फोटेक (इंडिया) लिमिटेड’Tarek Infotech (India) Limited कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी असून अनिल महिवाल, कोमल अनिल महिवाल, कालू राम जटाव व रोहित महेंद्र गौरव हे त्याचे संचालक आहेत. मुळात एका पब्लिक लिमिटेड कंपनीकडून खुलेआम एवढा मोठा घोटाळा केला जाणे आणि पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे याकडे लक्ष नसणे हि बाब नक्कीच पचनी पडणारी नाहीये. सध्या या कंपनीने आपले बस्तान गुजरात ला हलवले आहे. बहुतेक तिथेही नवीन नावाने नवीन स्कीम आणली असावी.
महाराष्ट्र वार्ता ऑपरेशन ‘ब्लॅक मार्ट’ अंतर्गत MLM, झटपट पैसे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचा पर्दाफाश करत आलेली नाही. प्रत्येक नवी बातमी प्रकाशित झाल्यावर शेकड्याने फसवणूक झालेल्या लोकांचे ई-मेल व व्हाट्सएप्प मेसेजस येतात. या साऱ्यांना या घोटाळेबाजांची तक्रार कशी करावी याबाबत आमची लीगल टीम मार्गदर्शनही करते. परंतू याचा विशेष काही फायदा होत नाही. मुळात या साऱ्या कंपन्या या कोणी एक व्यक्ती चालवत नसते. त्यात अनेक ठग गुंतलेले असतात. त्यामुळे हे सारे एक संघटित गुन्हेगारी प्रकारात मोडणारे आहे असे आता आमचे ठाम मत झालेले आहे. यावर उपाय एकच या घोटाळ्यात गुंतलेल्यांवर म्हणजेच यातले मास्टरमाईंड ते लीडर्स/एजन्ट यांच्यावर ‘मोक्का’ म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ नुसार कारवाई केली गेली पाहिजे. त्याशिवाय या कंपन्यांवर नियंत्रण मिळवणे अशक्य आहे. येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्र विधानसभेत पारित करावा अशी मागणी टीम महाराष्ट्र वार्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लवकरच करणार आहे. या बाबतच्या कच्च्या मसुद्यावर महाराष्ट्र वार्ता ची लीगल टीम सध्या काम करत आहे.
याच जोडीला ऑसमॉस टेक्नॉलॉजि Osmose Technology Pvt. Ltd. च्या घोटाळ्याची व्याप्ती पाहून शिवसेना नेते अँग्री मॅन नितीन नांदगावकर Nitin Nandgaonkar यांनी स्वतःहून टीम महाराष्ट्र वार्ता कडून हे प्रकरण जाणून घेतले व लॉकडाऊन उठल्यावर या व तारेक इन्फोटेक सारख्या MLM कंपन्यांविरुद्ध महाराष्ट्र वार्ता च्या साथीने धडक मोहीम सुरु करणार असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले कि या कंपन्यांचे जे संचालक आहेत त्यांना धुंडाळून शिवसेना स्टाईल ने त्यांचा समाचार घेतला जाईल व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनासहि या बाबी आणून घोटाळेबाजांना पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल.
तारेक इन्फोटेक व या सारख्या घोटाळेबाज MLM कंपन्यांकडून जर तुमची फसवणूक झाली असेल अथवा या संदर्भात तुमच्याकडे सविस्तर माहिती असेल तर आम्हाला इमॆल व व्हाट्सएप्प द्वारे जरूर कळवा. आमच्या प्रामाणिक प्रयत्नांना तुमची साथ अपेक्षित आहे तेव्हाच या घोटाळेबाज कंपन्या व ठगांना आपण नेस्तनाबूद करू शकतो शिवाय जोडीला नितीन नांदगावकरांसारखे सामन्यांचे सुपरमॅन आहेतच. खालील ई-मेल आयडीद्वारे आपण संबंधित विभागाला तक्रार दाखल करू शकता.(महाराष्ट्र वार्ता ला CC ठेवण्यास हरकत नाही.)

ठाणे आर्थिक गुन्हे DCP :  cp.thane.dcpeow@mahapolice.gov.in

CC to राज्य अति. पोलीस महासंचालक आर्थिक गुन्हे : adg.eowms@mahapolice.gov.in

CC to cm@maharashtra.gov.in 

CC to acs.home@maharashtra.gov.in

CC to  news@maharashtravarta.com

आपल्याकडेही अशाच प्रकारे सामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांची माहिती असेल तर आपण आम्हाला news@maharashtravarta.com वर ई-मेल द्वारे व 9372236332 वर व्हाट्सअप्प द्वारे पुराव्यानिशी कळवू शकता.

लिंक क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा    

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *