Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

डर के आगे जीत है …”या” पुस्तकात दिला आहे भीतीला घालवण्याचा मूलमंत्र

डर के आगे जीत है …”या” पुस्तकात दिला आहे भीतीला घालवण्याचा मूलमंत्र

कोणताही एक माणूस घ्या. त्याला एका खोलीत बसवा. त्यानं तिथे काही बटणं दाबायची आहेत आणि स्वत:च्या मनानं काहीतरी विशिष्ट गोष्ट करायची आहे. ती गोष्ट केल्यावर जर दिवा लागला तर त्यांना पॉईंटस मिळणार आहेत. असं त्यानं/तिनं पुढची ३० मिनिटं करुन किती पॉईंटस मिळवले ते पहायचं आहे..!

मानसशास्त्रज्ञांनी हा प्रयोग केल्यावर काय घडतं?

तर माणसं त्या खोलीत बसून बटणं दाबायला सुरुवात करतात.. या खेळात कधीतरी दिवा लागतो आणि त्यांना पॉईंट मिळतो. मग ते जरा तर्कानं “आधी काय करुन पॉईंटस मिळाले” असा विचार करुन त्या क्रमात बटणं दाबायचा प्रयत्न करायला लागतात. आता मात्र त्या क्रमानं गेल्यावर दिवा लागत नाही. मग ते जास्त गुंतागुंतीच्या क्रमानं म्हणजे एखादं बटण तीनदा दाबणं, मग पाच सेकंद थांबणं.. मग तरीही दिवा लागला नाही तर.. बटणांचा दिवा लागण्याशी संबंध असेल का नाही? असा विचार करुन स्वस्थ बसणं, मध्येच पायानं काहीतरी दाबून पहाणं असं सुरु करतात.

साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटात हे करुन जास्त पाईॅंटस मिळतात असा एखादा क्रम किंवा एखादी पध्दत माणसं शोधतातच. उदाहरणार्थ, एका पायावर उभं राहून तोल सांभाळणं, ठरावीक वेळात जास्तीत जास्त बटणं दाबणं.. असं काहीही ते करुन पहातात. मग दिवे लागतात, त्यांना पॉईंटस मिळत रहातात. परिणामी, त्या खोलीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला हा खेळ आपल्याला कळला आणि आपण जिंकलो असं वाटतं. एका मुलीनं तर छतावर ठरावीक वेळा ठोकून आवाज केल्यावर दिवा लागतो असं शोधलं होतं. बाहेर पडली तेव्हा ती उड्या मारुन दमली होती…!

यातली सर्वात मोठी गंमत म्हणजे, पॉईंटस मिळवण्यासाठी ठरावीक पध्दत अशी काही नसतेच. क्रमही नसतो. दिवा आपला मधूनमधून लागत असतो. माणसांना मात्र आपल्या कृतीमुळेच तो दिवा लागतोय असं वाटत मात्र असतं…! अशा अनेक (गैर)समजांवर आपल्या विचारांचा पाया उभा असतो.

उदाहरणच घ्यायचं झालं तर, कोणीतरी एक स्त्री अविवाहित आहे आणि तिला जोडीदार हवा आहे. पण ती घराबाहेर पडून त्यासाठी काहीच करत नाही. कोणीतरी एक पुरुष दिवसरात्र मेहनत करतोय आणि आपण बढतीसाठी पात्र आहोत असं त्याला वाटतंय.. पण तो तसं बॉससमोर बोलूनच दाखवत नाही. त्या दोघांना आपण नाकारले जाऊ अशी भीती वाटत असते.

खरं सांगायचं तर अशी भीती बाळगणं हे खूप सोपं आहे. “मी पुरेशी आकर्षक नाही” किंवा “माझा बॉस महाभयानक आहे, तो मला चांगलं म्हणणं शक्यच नाही” असा विचार करणंच महाभयानक आहे. पण हेच योग्य आहे असं समजून आपण अशा भ्रामक समजुतींना धरुन बसतो. आयुष्यात काय होणार आहे याची आपल्याला पूर्ण खात्री आहे अशी आपल्याला खात्रीच असते…!

अशा समजुतींना कवटाळून बसण्यापेक्षा आपल्या या समजुतींवर शंका घेणं सुरु करा..!

“The Subtle Art of Not Giving a F*ck” या मार्क मॅन्सनच्या पुस्तकातून..!

© नीलांबरी जोशी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *