
विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्याची शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
मुंबई, दि. ४: विधानसभा निवडणुकीनंतर बहुमताने निवडून आलेल्या महायुती सरकारने सत्ता स्थापन करत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान केले. परंतु, विरोधीपक्षनेतेपद हे रिकामे होते. आज अखेर विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदावर भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी अशी मागणी करणारे पत्र आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अध्यक्ष राहुल नार्वेकरांना देण्यात आलं. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हि माहिती दिली. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला शरद पवारांच्या पक्षाने ठेवल्याची चर्चा सुरू असल्याबाबत ठाकरे यांना विचारणा करण्यात आली. त्यावर स्वतः उद्धव ठाकरेंनीच स्पष्टीकरण दिलं कि विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही. यावेळी त्यांनी संतोष देशमुख प्रकरणाबाबतही भाष्य केले. यावेळी त्यांनी सवाल केला कि एवढे फोटो, व्हिडीओ समोर आल्यानतंरही धनंजय मुंडे जर आजारामुळे राजीनामा देत आहे असं म्हणत असतील तर त्यांचा देशमुख प्रकरणात राजीनामा का घेतला गेला नाही?