“पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवलं जातंय” – अंबादास दानवे
संभाजीनगर, दि. १३: पुणे भूखंड घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवलं जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. राज्यात गैरव्यवहार उघडकीस येतात मात्र, भारतीय जनता पक्षाकडून त्यांना वाचवलं जातं, असं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्याकडून शहरातल्या मतदार यादीत घोटाळा करण्यात आला असून, हे काम अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली केलं असेल, असा आरोपही दानवे यांनी केला.
सध्या शिवसेना नेते अंबादास दानवे हे महायुतीशी विशेषतः शिंदे गटासोबत दोन हात करताना दिसत आहेत. काल दानवे यांनी मराठवाडा दौऱ्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक फेसबुक पोस्ट करत टीकास्त्र सोडलं. अंबादास दानवे म्हणाले, “‘आपण मराठवाड्यात फिरलात’.. असे आपण परभणीत सपशेल खोटे बोललात.. Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
