ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
मुंबई, दि. २४: स्टँडउप कॉमेडियन कुणाल कामरा याने एका शो मध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता एक विडंबनात्मक गीत गायलं होतं. यात कुणाल ने गद्दार, ठाणेची रिक्षा, चेहऱ्यावर दाढी अशा शब्दांचा वापर केला आहे. या गीताचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर शिंदे गटाने तात्काळ निषेध नोंदवत खाररोड येथील ज्या हॉटेल मधील हॉल मध्ये शो पार पडला त्याची तोड-फोड केली. तसेच शिंदे गटाचे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी कुणाल कामरा याला दोन दिवसांत माफी माग अन्यथा तुझ्या तोंडाला काळे फासू असा धमकी वजा इशारा दिला आहे. या वादात दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाने कुणाल कामरा याची बाजू उचलून धरली आहे.
हेच ते गीत ज्यामुळे शिंदे गट डिवचला गेलाय
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये…
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये…?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए…
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए…
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला की, “ये उनकी राजनीति है। वे पारिवारिक कलह को खत्म करना चाहते थे। उन्होंने किसी के पिता को चुरा लिया। इसका क्या जवाब होगा? क्या मैं कल तेंदुलकर के बेटे से मिलूं, भाई, चलो डिनर करते हैं। मैं तेंदुलकर की प्रशंसा करता हूं और उनसे कहता हूं, भाई, आज से वे मेरे पिता हैं।”
