Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांकडून राज्यातील ऍम्ब्युलन्स चालकांची पिळवणूक; ८,९०० रुपये महिना वेतनात केली जातेय बोळवण !

मुख्य कंत्राटदार राज्यातला अन उपकंत्राटदार मध्यप्रदेशातला पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्यास प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ? रत्नागिरी/मुंबई, दि. : २०१९ सालच्या अखेरीस जगावर भूतो न भविष्याती असे जागतिक महामारीचे संकट कोसळले. या संकट काळात... Read more »

सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ३ रिश्टर स्केल सातारा, दि.२३: सातारा जिल्ह्यात कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे.... Read more »

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

“कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी मी आलो आहे, केवळ फोटो सेशनसाठी नाही” – मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर रत्नागिरी, दि.२१: आज सकाळी मुंबईहून रत्नागिरी येथे पोहचल्यावर प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला. नुकसान झालेल्या शेती आणि फळबाग यांचे पंचनामे दोन दिवसांत तातडीने करावेत असे सांगितले आहे. कोकणवासीयांना दिलासा... Read more »

अणूप्रकल्पातील दूषित पाणी समुद्रात सोडण्यास चीनचा विरोध; वाचा नेमकं प्रकरण काय आहे

अणूप्रकल्पातील दूषित पाणी समुद्रात सोडण्यास चीनचा विरोध; वाचा नेमकं प्रकरण काय आहे रत्नागिरी/चीन/जपान: २०११ साली महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प होऊ नये यासाठी स्थानिकांनी आंदोलन केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख व... Read more »

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रत्येकी ७५ कोटींचे प्रस्ताव तातडीने देण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

दरवर्षी शंभर कोटींप्रमाणे दोन्ही जिल्ह्यांना तीन वर्षात ३०० कोटींचा निधी मुंबई, दि. ३१ : ‘सिंधुरत्न समृद्ध’ पथदर्शी योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरवर्षी शंभर कोटीप्रमाणे तीन वर्षात तीनशे कोटींचा निधी देण्यात येईल.... Read more »

पर्ससीन नेट, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाईचे मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

अवैध मासेमारी रोखण्यासाठी लवकरच कडक कायदा आणणार मुंबई : राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील एलईडीद्वारे तसेच अवैध पर्ससीन नेटद्वारे व हायस्पिड बोटीद्वारे चालणाऱ्या मासेमारीविरुद्ध कारवाईसाठी राज्य शासन कडक कायदा येत्या काही काळात आणणार आहे. अशा... Read more »

मनसेचा ‘नाणार’ रिफायनरी ला हिरवा कंदील? राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नाणार प्रकल्पाबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याची केली विनंती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर स्थित नाणार प्रकल्पावरून गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकीय पटलावर मोठं रणकंदन माजलेलं पाहायला मिळालं. मागील सरकारमध्ये भागीदार राहिलेल्या शिवसेना व भाजपमध्ये तर... Read more »

रत्नागिरीतील हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन

रत्नागिरीतील हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन मुंबई, दि. ५: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली(Dapoli) तालुक्यातील हर्णे(Harnai) बंदराचा लवकरच कायापालट होणार आहे. तसेच अंजर्ला येथे ग्रायन्स पद्धतीचा... Read more »

सामनातील ‘नाणार रिफायनरी’च्या जाहिरातीवरून माजी खासदार निलेश राणेंची सेनेवर बोचरी टीका

सामनातील ‘नाणार रिफायनरी’च्या जाहिरातीवरून माजी खासदार निलेश राणेंची सेनेवर बोचरी टीका मुंबई/रत्नागिरी : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना च्या मुख्य पानावर आज चक्क नाणार रिफायनरी ची भलामण करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या... Read more »

रत्नागिरीचा चैतन्य परब आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन स्पर्धेत देशात दुसर

आकाशवाणीच्या विशेष समारंभात होणार सत्कार नवी दिल्ली: रत्नागिरीच्या चैतन्य परब या बाल कलाकाराने आकाशवाणीच्या शास्त्रीय गायन (ख्याल गायन) स्पर्धेत देशातून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. १७ डिसेंबर रोजी  दिल्ली येथे आकाशवाणीच्या  विशेष समारंभात चैतन्यला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या वतीने दरवर्षी संगीताच्या विविध प्रकारात स्पर्धा घेतल्या जातात. युवा कलाकाराला प्रोत्साहन आणि राष्ट्रीय मंच उपलब्ध व्हावा या उद्देशाने या स्पर्धांचे देश पातळीवर आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा दोन टप्प्यात घेतली जाते. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात झालेली प्राथमिक फेरी यशस्वी पार पडून चैतन्यची  दिल्लीतील अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. या अंतिम फेरीसाठी कोलकाता, दिल्ली, मुंबई, पुणे आदी केंद्रातून स्पर्धक दाखल झाले होते. तज्ज्ञ परीक्षक मंडळाने शास्त्रीय संगीत (ख्याल गायन) मुलांच्या गटात दिल्लीच्या पुलकित शर्मा याची प्रथम तर रत्नागिरीच्या चैतन्य परब ची  द्वितीय क्रमांकासाठी निवड केली. चैतन्य हा रत्नागिरीतील अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. चैतन्यने संगीताचे सुरूवातीचे शिक्षण त्याची आई  विनया परब यांच्याकडे घेतले. गेली चार वर्षे तो किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांच्याकडे शास्त्रीय गायनाची तालीम घेत आहे. चैतन्यने सहाव्या वर्षी अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या गायनाची पहिली परीक्षा दिली. तसेच त्याने मंडळाची हार्मोनियममधील मध्यमा प्रथम ही परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. चैतन्य सध्या गायनाची उपांत्य विशारद ही परीक्षा देत आहे. Read more »