भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ३ रिश्टर स्केल
सातारा, दि.२३: सातारा जिल्ह्यात कोयना धरणापासून १० किलोमीटरच्या परिसरात आज सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ पूर्णांक ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणतीही कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.
गेल्या दोन महिन्यांमध्ये कोयना धरण परिसरात बसलेला हा भूकंपाचा तिसरा धक्का आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही देवरूख परिसर आणि संगमेश्वर तालुक्यात साडवली, कडवई परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. काही घरात भांडी ठेवण्याचे रॅक हलल्यानं भांड्यांच्या आवाज झाला आणि नागरिकांना भूकंपाची जाणीव झाली.