“३ मे २०२३ च्या आदेशाची अंमलबजावणी कंपनी टाळू शकणार नाही” – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई, दि. ८: दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी ऑल इंडिया स्पाइसजेट स्टाफ आणि एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे मुंबई उच्च न्यायालयात स्पाइसजेट SpiceJet Limited कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजय सिंग यांच्या विरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी याचिका दाखल केली होती. हि याचिका ५ फेब्रुवारी, २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्याकडे सुनावणीस आली. यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले कि स्पाइस जेटचे प्रमुख अजय सिंग Ajay Singh यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येईल आणि कंपनीने ३ मे २०२३च्या आदेशात बदल करण्यासाठी केलेल्या अर्जाच्या सुनावणीस विलंब लावून कंपनी ३ मे २०२३ च्या आदेशाची अंमलबजावणी टाळू शकणार नाही.
या याचिकेमध्ये कंपनीने वारंवार केलेला न्यायालयाच्या आदेशाचा भंग आणि अवमान तसेच कंपनीच्या अधिकाऱ्याने शपथेवर दिलेली असत्य विधाने उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. कंपनीच्या प्रमुखांनी जाणून बुजून न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि सर्व कामगारांना पूर्णपणे दिलासा आणि न्याय मिळावा, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश पाळण्यास कंपनीला भाग पाडावे असे याचिकेमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सबंध प्रकरण जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.maharashtravarta.com/spicejet-avaman/
न्यायालयाच्या अवमान याचिकेवर पुढील सुनावणी १८ मार्च, २०२४ रोजी होईल. असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. जयप्रकाश सावंत Adv. Jaiprakash Sawant, ॲड. रंजना तोडणकर Adv. Ranjana Todankar आणि ॲड. अनिता मुरगुडे Adv. Anita Murgude काम पाहत आहेत तर कंपनीच्या वतीने वरिष्ठ ॲड. किरण बापट, ॲड. महेश शुक्ला आणि ॲड. नीरज प्रजापती काम पाहत आहेत. स्पाइस जेट सारख्या बलाढ्य कंपनीच्या बेकादेशीर कृतीविरुद्ध अतिशय नेटाने आणि जागृतपणे लढा देण्याचा कामगारांचा निर्धार असल्याचे असोसिएशनचे सरचिटणीस राजेश पाटील यांनी नमूद केले आहे.