“उसुलों पर जहाँ आँच आये, टकराना जरुरी है”; शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शेर ने भाजप घायाळ
मुंबई: शिवसेना-भाजपच्या शीतयुध्दात रोज नवनवीन सत्ता-समीकरणांचे दावे-प्रतिदावे दोन्ही बाजुच्या नेत्यांकडून केले जात आहेत. यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मागे नाही. शिवसेना आपल्या ५०-५० टक्के सत्तेतील वाट्याच्या मागणीबाबत जास्त आक्रमक आहे तर भाजपही या मागणीला टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
शिवसेनेच्या वतीने नेते खासदार संजय राऊत हे रोज नवनवीन वक्तव्य करून माध्यमांनाही मसाला पुरवत आहेत. आपल्या वक्तव्यांनी ते भाजपला घायाळ करताना दिसत आहेत. आज ट्विटरवर एक हटके ट्विट करत त्यांनी भाजपला युती धर्माची आठवण करून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये वसीम बरेलवी यांचा एक शेर म्हटला आहे. “उसूलों पर जहाँ आँच आये,
टकराना ज़रूरी है
जो ज़िन्दा हो,
तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है ….
जय महाराष्ट्र…” हाच तो शेर ज्यात त्यांनी भाजपला तिरकस बाण मारला आहे.
शिवाय आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे की शिवसेनेला १७० आमदारंच समर्थन असून हा आकडा १७५ पर्यंतही जाऊ शकतो.
