Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video |भाग २| अजिंक्य डी वाय पाटील इन्फ्रा वर मेहेरनजर कुणाची? ६९३ कोटींच्या MbPT रुग्णालय निविदा घोटाळ्यातलं मोठं कोडं

मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल पुनर्निर्माण प्रकल्पातील कथित घोटाळ्या प्रकरणी ट्रस्टी केरसी पारेख यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग पहा

Video || भाग २ || पहा संपूर्ण व्हिडिओ

मागील बातमी (भाग १)

MbPT चे माजी अध्यक्ष व राज्याचे विद्यमान उपलोकायुक्त संजय भाटिया व मुख्य वैद्यकीय अधिकारी अण्णा दुरई यांच्या अकार्यक्षमतेला धरले जबाबदार

मुंबई, दि. २४: मुंबई पोर्ट ट्रस्टचे (Mumbai Port Trust) चे वडाळा येथील स्वतःच्या मालकीचे रुग्णालय सार्वजनिक-खाजगी भागीदारी म्हणजे पी.पी.पी. तत्त्वावर सुपर स्पेशिअलिटी रुग्णालय करण्याचे २०१८ मध्ये ठरले. या प्रकल्पाच्या सुरुवातीलाच पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष आणि काही अधिकाऱ्यांनी एका खाजगी कंपनीवर केलेली मेहेरनजर, त्यामुळे प्रकल्पास होणारा विलंब, कामगार तसेच पोर्ट ट्रस्टचे होणारे नुकसान या बाबींवर प्रकाश टाकत हे सर्व प्रकरण थेट पंतप्रधानांपर्यंत पोचविणारे ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार विश्वस्त केरसी पारेख(Kersi Parekh) यांच्याकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न महाराष्ट्र वार्ताच्या प्रतिनिधीने केला. या साऱ्या अनियमिततेकडे सर्वात आधी महाराष्ट्र वार्ता(Maharashtra Varta) ने २०२० च्या जुलै महिन्यात लक्ष वेधले होते हे विशेष.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हॉस्पिटलचा दर्जा आणि क्षमता वाढविण्याच्या हेतूने सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पी. पी. पी.) तत्त्वावर पोर्ट ट्रस्टचे हॉस्पिटल चालविण्याचे ठरविण्यात आले. केंद्र सरकारच्या स्थायी अर्थ समितीने निर्धारित केलेल्या निकषानुसार पोर्ट ट्रस्टने ६९३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाकरिता १५ ऑक्टोबर २०१८ रोजी निविदा जाहीर केली. आश्चर्य म्हणजे या निविदेला १४ व्या वेळी फक्त एकाच म्हणजे मेसर्स अजिंक्य डी. वाय. पाटील इंफ्रा प्रा. लिमिटेड(Ajeenkya D. Y. Patil Infra Pvt. Ltd.) या कुठलेही नामांकित इस्पितळ चालविण्याचा अनुभव नसलेल्या आणि निविदेत स्पष्ट केलेल्या तांत्रिक आणि आर्थिक पात्रता नसलेल्या कंपनीने बोली लावली आणि पोर्ट ट्रस्टच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या कृपेने या कंपनीची बोली स्वीकारण्यात आली.

केरसी पारेख यांची सविस्तर मुलाखत पहा : भाग १

निविदेमधील अटींप्रमाणे या कामाकरिता स्पेशल पर्पज व्हेहिकल म्हणून बीपीटीच्या भागीदारीने नवीन कंपनी स्थापन करणे सक्तीचे होते .

या दृष्टीने केवळ दहा लाखाचे भाग भांडवल असणाऱ्या झोडियाक हेलेंट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड(Zodiac Healotronics Pvt. Ltd.) या त्रयस्थ कंपनीची सुमारे ६९३ कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यासाठी स्थापना करण्यात आली. ३ आक्टोबर २०१९ रोजी या कंपनीबरोबर पोर्ट ट्रस्टने कन्सेशन करार केला. निविदेला बोली लावणारी कंपनी आणि या कामाकरिता नव्याने निर्माण करण्यात आलेली कंपनी यामधील व्यवस्थापन भिन्न होते. मात्र सर्वांनी डोळ्यावर झापड लावली होती. करार झाल्यापासून १८० दिवसात सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतरच हॉस्पिटलची जागा आणि व्यवसाय या नवीन कंपनीला सुपूर्द करावयाचा होता. मात्र तत्कालीन पोर्ट ट्रस्ट अध्यक्षांनी ते सेवा निवृत्त होण्यापूर्वीच या कंपनीला बांधकाम करून देण्याच्या आणि रीतसर काम सुरु करू देण्याच्या निमित्ताने उद्घाटन समारंभ आयोजित केला.

नेमकं याच वेळी या कृतीला ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन आणि दुसऱ्या एका युनियनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अटकाव आणला. उच्च न्यायालयामध्ये पोर्ट ट्रस्ट आणि झोडियाक कंपनीने आश्वासन दिले की करारामधील पूर्वअटींची पूर्तता झाल्याशिवाय हॉस्पिटल हस्तांतरित करण्यात येणार नाही. मात्र उच्च न्यायालयात दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासून मुंबई पोर्ट ट्रस्टने घाईगडबडीने २२ फेब्रुवारी २०२१ रोजी विश्वस्तांच्या बैठकीत झोडियाक कंपनीवर सवलतींची खैरात करून आणि करारामधील अटींचा भंग करून या कंपनीला हॉस्पिटल हस्तांतर करण्याचा प्रस्ताव आणला. या प्रस्तावाला युनियनचे सरचिटणीस व कामगार विश्वस्त केरसी पारेख यांनी तीव्र विरोध केला. परंतु बहुमताच्या जोरावर आणि सत्तेचा दुरुपयोग करून पोर्ट ट्रस्टच्या विद्यमान अध्यक्षांनी विश्वस्तांच्या बैठकीत ठराव मंजुर करुन घेतला आणि हा ठराव मंजुरीसाठी नौकानयन मंत्रालयाकडे पाठविला असा पारेख यांचा आरोप आहे.

हा सर्व प्रकार नियमबाह्य असून पोर्ट ट्रस्ट आणि कामगारांच्या हिताचा नाही. पोर्ट ट्रस्ट च्या मौल्यवान दहा एकर जमिनीवर स्वतःचे खासगी हॉस्पिटल थाटण्याचा आणि त्यासाठी पोर्ट ट्रस्टच्याच निधी आणि सवलतींचा फायदा उठविण्याचा या खाजगी कंपनीचा इरादा आहे. दुर्दैवाने या सर्व गैरप्रकाराला पोर्ट ट्रस्टमधील अधिकाऱ्यांची साथ आहे. सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. झोडियाक कंपनी, हॉस्पिटलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवा/शर्ती अबाधित ठेवण्यास आणि विद्यमान तसेच सेवानिवृत्त कामगारांना उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्यास आणि सारा प्रकल्प वेळेवर आणि सुव्यवस्थित चालविण्यास असमर्थ आणि अपात्र आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.

टेंडर प्रक्रियेतील घोळ, अपात्र कंपनीला कामाचे अवॉर्ड, नियमांची घोर पायमल्ली तांत्रिक आणि आर्थिक क्षमतेचा अभाव, खाजगी कंपनीवर मेहेरनजर, पोर्ट ट्रस्ट आणि कामगारांचे नुकसान, अधिकाऱ्यांचे अनुचित आणि अयोग्यवर्तन तसेच मनमानी आणि गैरकारभार अशा अनेक विषयांकडे लक्ष वेधणारे तब्बल १९ पानांचे सविस्तर निवेदन केरसी पारेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ८ मार्च, २०२१ रोजी पाठविले.

स्वच्छ प्रशासनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी आणि सर्व बाबतीत पात्र असणाऱ्या खाजगी कंपनीच्या सहभागानेच पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलचे सुपरस्पेशलीटी हॉस्पिटल करण्याचा प्रकल्प राबविला जावा अशी त्यांनी आग्रहाची विनंती करण्यात आली. पंतप्रधानांना पाठविण्यात आलेल्या या तक्रार वजा निवेदनाची नोंद शिपिंग मंत्रालयाने घेतली असून या गैर कारभाराविषयी पोर्ट ट्रस्ट कडून जाब मागितला आहे असे कळते.

केरसी पारेख यांनी देशाच्या पंतप्रधानांना सादर केलेल्या दिनांक ८ मार्च २०२१ च्या निवेदनामुळे पीपीपी च्या नावाखाली मुंबई पोर्ट ट्रस्टचे हॉस्पिटल आणि पोर्ट ट्रस्टची प्रचंड जमीन भ्रष्ट मार्गाने खासगी मालकाला देण्याचा मुबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांचा कुटील डाव उधळला जाणार आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. या संदर्भात महाराष्ट्र वार्ता(Maharashtra Varta) शी वार्तालाप करताना केरसी पारेख यांनी या साऱ्या गोंधळासाठी तत्कालीन मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष  व राज्याचे विद्यमान उपलोकायुक्त संजय भाटिया(IAS Sanjay Bhatia) व मुंबई पोर्ट ट्रस्ट चे मुख्य वैद्यकीय अधिकारी अण्णा दुरई(Anna Durai) यांना जबाबदार धरले आहे.

अजिंक्य डी. वाय. पाटील इन्फ्रा Ajeenkya D. Y. Patil Infra Pvt. Ltd. सारख्या खाजगी मालकाच्या दावणीला मेडिकल डिपार्टमेंटचे डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर कामगार बांधले जाऊ देणार नाही आणि योग्य मार्गानेच विद्यमान तसेच सेवानिवृत्त कामगारांच्या आरोग्याच्या सेवांकरिता पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये सुधारणा घडवू अशी ग्वाही केरसी पारेख यांनी दिली आहे.

त्यांनी पुढाकार घेऊन आरंभ केलेल्या आंदोलनामध्ये सर्व कामगार बंधू भगिनी सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र वार्ता(Maharashtra Varta)ची टीम या महाघोटाळ्याशी संबंधित घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.

खालील लिंकवर क्लीक करा आणि आम्हाला न चुकता YOUTUBE Channel || Facebook || Twitter || INSTARAM ला SUBSCRIBE | LIKE | FOLLOW करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *