Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची’ रईस लष्करीयांवर एवढी ‘माया’ का?

अधिकृत तक्रारिवर महिना उलटूनही अद्याप उत्तर नाही की कारवाई नाही

मागील काही काळापासून महाराष्ट्र वार्ता ची ‘आपली समस्या’ टीम मुंबईतील वरळीस्थित परेल सह्याद्री(एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्थेतील विकासक रईस लष्करिया यांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने केलेल्या घोटाळ्याबाबत वृत्त प्रसारित करीत आहे. या काळात गृहनिर्माण संस्थेतील श्री. सावंत व तुकाराम चोखामगरे यांनी येथील समस्यांची जंत्री सर्वांसमोर मांडली. त्यासंदर्भात महाराष्ट्र वार्ताच्या लीगल टीम ने प्राथमिक स्वरुपात ऑनलाईन माध्यमातून ‘एसआरए’ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. परंतू विहित मुदत उलटूनही अद्याप उत्तर प्राप्त झालेले नाही. या संदर्भात अखेर दोन दिवसांपूर्वी आमच्या टीम ने उपमुख्य अभियंता आर. बी. मिटकर यांच्याकडे तक्रार नोंदवली.

दरम्यानच्या काळात समांतर पद्धतीने परेल सह्याद्री(एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी महाराष्ट्र वार्ताच्या सहाय्याने ‘झोपु’ प्राधिकरणाकडे सामूहिकरीत्या लेखी तक्रार पत्र दिलेले आहे.

या सर्व तक्रारपत्रांमध्ये महाराष्ट्र वार्ताने विकासक लष्करीया व अधिकाऱ्यांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्यांची पोलखोल केली असून विशेषतः रईस लष्करिया यांच्यावर अधिकाऱ्यांनी अद्याप कारवाई न केल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे असून घोटाळे करून वंचितांच्या घरांवर डल्ला मारून निर्धास्त असणाऱ्या या विकासकाला कुठल्याही परिस्थितीत भोगवटा प्रमाणपत्र न देण्याबाबत प्रशासनाकडे विनंतीही केली आहे.

कोण आहेत रईस लष्करिया?

रिलायंस कन्स्ट्रक्शन (अंबानींची नवे) चे प्रवर्तक व लष्करीया कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक आहेत. रईस लष्करिया हे मुंबईतील एक मोठे विकासात मानले जातात त्यांची विशेष रुची ही एसआरए प्रकल्पांत असल्याचे दिसून आले आहे. लष्करीया यांनी मधल्या काळात अनेक मराठी चित्रपटांची निर्मितीही केली असून स्वराज्य, एकतारा हे त्यापैकी नावाजलेले काही चित्रपट. पूर्वाश्रमीपासून काँग्रेसी असलेले रईस लष्करिया यांनी २०१४ साली अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती ज्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. सध्या लष्करिया सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी जवळीक असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली नसल्याचे खाजगी सांगितले जाते.

मागील वर्षी अंधेरी पश्चिमतील कामा रोड, गावदेवी डोंगर येथील लष्करीया यांच्या कंपनीने विकसित केलेल्या एसआरए प्रकल्पांमधील एका इमारतीचा स्लॅब कोसळला होता. या दुर्घटनेत दोन लोकं जखमीही झाले होते. यावेळीही येथील रहिवाशांनी विकासक रईस लष्करीया यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी एसआरए प्रशासनाकडे मागणी केली होती. ज्याकडे प्रशासनातील अभियंत्यांनी कानाडोळा केल्याचे कळते.

परेल सह्याद्री (एसआरए) गृहनिर्माण प्रकल्पात तर एसआरए अभियांत्रिकी विभागाची लष्करीयांवर विशेष ‘माया’ असल्याचे दिसते. एकूणच लष्करीयांच्या या व इतर प्रकल्पांतील घोटाळ्यांकडे महाराष्ट्र वार्ता ची ‘आपली समस्या’ टीम फार गांभीर्याने पाहत असून सामान्य गरीब माणसाचा हक्क मारणाऱ्यांबाबत येत्या काळात आणखी कठोर पावले उचलणार आहे.

अनधिकृत बांधकाम, विकासकाकडून फसवणूक, सरकारी दिरंगाई व आर्थिक घोटाळे संदर्भातील आपल्या काही तक्रारी असतील तर महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम च्या ‘आपली समस्या’ टीम ला आपण 9372236332 वर व्हाट्सअप्प आणि news@maharashtravarta.com वर ईमेल द्वारे पुराव्यानिशी माहिती देऊ शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *