Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाजपचे प्रशांत ठाकूर हे होतील का पनवेलचे सुभेदार ? काय आहे त्यांच्या मतदारसंघातील कौल

भाजपचे प्रशांत ठाकूर हे होतील का पनवेलचे सुभेदार ? काय आहे त्यांच्या मतदारसंघातील कौल

पनवेल (सोनाली भवर) :सध्या विधानसभा निवडणुकांचा ज्वर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वच राजकीय-निमराजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार चालू आहे. कोण जिंकेल आणि कोण हरेल हे दिनांक २४लाच कळेल. पण तत्पूर्वी आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा आढावा घेऊयात.

पनवेल विधानसभा क्षेत्र १८८
उमेदवार – प्रशांत रामशेठ ठाकूर (भाजप)
निशाणी – कमळ

रायगड जिल्ह्यातील या मतदारसंघात जवळपास पाच लाख पंधरा हजार मतदार आहेत. याठिकाणी प्रशांत ठाकूर हे विद्यमान आमदार असून ते सत्ताधारी भाजपचे प्रतिनिधित्व करतात.

ही त्यांची तिसरी निवडणूक आहे. २००९ व २०१४ साली अनुक्रमे काँग्रेस व भाजपकडून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. गेल्या दोन निवडणुकांत त्यांना शहरी भागातून मोठा लीड मिळाला होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या बाळाराम पाटील यांनी ग्रामीण विभागातून जास्त मतं मिळवली होती. परंतु गेल्या ५ वर्षात पुलाखालून बरंच पाणी निघून गेलं. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समस्यांचा डोंगर वाढताच राहिला. पाण्याच्या आणि खराब रस्त्यांच्या समस्येमुळे शहरी भागातील मतदार विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर नाराज असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी कामोठे व खारघर विभागातील नागरिकांनी “विकास नाही तर मत नाही” (No Development, No Vote) अशी बॅनरबाजी करत आपला रोष व्यक्त केला. या साऱ्यांचा रोख हा नित्य भेडसावणारी पाण्याची समस्या आणि खराब रस्ते यावरच होता. प्रशांत ठाकूर यांच्यासमोर दखल घेण्याजोगे दोनच प्रमुख विरोधक सध्यातरी दिसत आहेत. एक आहेत शेकाप महाआघाडीचे हरेश केणी आणि अपक्ष पत्रकार कांतीलाल कडू. या दोघांचा रोख हा अपूर्ण प्रकल्प आणि विभागातील समस्यांवर आहे.

जिंकण्यासाठी जमेच्या बाजू

चला प्रशांत ठाकूर यांना विजयाजवळ नेऊ शकणाऱ्या जमेच्या बाजूंवर जरा नजर फिरवू. गेल्या ५ वर्षांत भलेही शहरी मतदार त्यांच्यावर नाराज असला तरी याच काळात पनवेल ग्रामीण मधील त्यांचा जनाधार वाढल्याचे दिसते. शेतकरी कामगार पक्षाची झालेली पीछेहाट हे त्यामागचे पाहिले महत्वाचे कारण आणि ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना हवा असलेला सिडको नैना प्रकल्प हे दुसरे. सिडको चे अध्यक्षपदही सध्या प्रशांत ठाकुरांकडेच आहे. गेल्या ५ वर्षात पनवेल ग्रामीण भागात झालेली रस्त्याची अनेक कामे, सभोवती होणाऱ्या नव-नवीन रहिवासी वसाहतींमुळे वाढलेले ग्रामपंचायतींचे उत्पन्न आणि त्यायोगे वाढलेल्या सुविधा यामुळेही ठाकूर यांना यावेळी येथून बढत मिळण्याची शक्यता जास्त आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघातून त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे यानिवडणुकीत प्रशांत ठाकूर यांचे पारडे जड दिसत असले तरी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे संदर्भ काहीशे वेगळे राहत असल्यामुळे त्यांची धाकधूक वाढू शकते. तरीही नाराज मतदारांना शांत करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांना त्यांची ओघवती वाणी आणि विनम्र स्वभाव ही दोन अस्त्रच सध्यातरी कामी येऊ शकतात इतकंच म्हणता येऊ शकतं.

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *