Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने पहिली यादी केली जाहीर; पाठोपाठ अजित पवार गटाने उघडले आपले पत्ते

अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाने पहिली यादी केली जाहीर; पाठोपाठ अजित पवार गटाने उघडले आपले पत्ते

मुंबई, दि. ३०: जवळपास सर्व पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले तरी शरद पवार गटाने आपली उमेदवार यादी जाहीर केली नव्हती. आज अखेर तो दिवस उजाडला. आज सायंकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

अमर काळे – वर्धा

भास्कर भगरे – दिंडोरी

सुप्रिया सुळे – बारामती

अमोल कोळे – शिरूर

निलेश लंके – अहमदनगर

हि यादी जाहीर झाल्यानंतर थोड्याच वेळात राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली असल्याचे जाहीर केले. याच सोबतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून असतील अशी खा. सुनिल तटकरे यांनी घोषणा केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *