Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वाशी सार्वजनिक रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आरोग्य सेवा गुणवत्ता वाढीसाठी मौलिक सूचना

वाशी सार्वजनिक रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करीत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आरोग्य सेवा गुणवत्ता वाढीसाठी मौलिक सूचना

नवी मुंबई, दि. ४: नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारल्यापासून डॉ. कैलास शिंदे यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास पहिल्या दिवसापासूनच सुरुवात केली असून त्यासोबतच क्षेत्रीय भेटींव्दारे प्रत्यक्ष पाहणीलाही सुरुवात केली आहे.
या अनुषंगाने आयुक्तांनी आज वाशी येथील महानगरपालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाला भेट देत तेथील कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला व सुधारणेच्या दृष्टीने मौलिक सूचना केल्या. महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तीन रुग्णालयांपैकी वाशी रुग्णालयामध्ये नागरिक सर्वाधिक संख्येने उपचारासाठी येत असतात. त्याठिकाणची दैनंदिन बाहयरुग्ण (ओपीडी) संख्याही अधिक आहे. त्यादृष्टीने तेथे नागरिकांसाठी पुरेशी बैठक व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध असावे तसेच ओपीडी रजिस्ट्रेशन जलद होण्याची कार्यवाही व्हावी आणि तेथील प्रदर्शनी भागात आरोग्यविषयक माहिती देणारे पोस्टर्स, डिजीटल फलक अशी आरोग्य सूचनांची प्रचार साधने वाढवावीत असे निर्देश त्यांनी दिले.
तळमजल्यासह तिन्ही मजल्यांवरील वैद्यकीय सेवांची पाहणी करताना तेथील हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने तत्परतेने उपाययोजना कराव्यात तसेच अंतर्गत स्थापत्य व रंगरंगोटीची कामेही जलद करुन घ्यावीत असे निर्देश आयुक्तांनी दिले. रुग्णालयात येणाऱ्या व्यक्तीला प्रसन्न वातावरण लाभावे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे त्यांनी सूचित केले. त्याचप्रमाणे अंतर्गत स्वच्छतेवर अधिक लक्ष देण्याच्या सूचनाही दिल्या. रूग्णांना देण्यात येणा-या भोजनाचा दर्जाही उत्तम राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले.
रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना औषधचिठ्ठी न देता रुग्णालयामार्फतच औषध पुरवठा करण्यात येतो. या प्रिस्क्रीप्शन फ्री सेवेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल व याबाबतची कोणतीही तक्रार प्राप्त होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाचा केसपेपर काढण्यापासून ते आंतररुग्ण (आयपीडी) सेवा घेऊन तो बरा होऊन परत जाईपर्यंतच्या कार्यालयीन नोंदी डिजीटल स्वरुपात घेतल्या जाव्यात यादृष्टीने एचएमआयएस (हॉस्पिटल मॅनेजमेंट इंटिग्रेटेड सिस्टीम) प्रणाली अदययावत करण्याचे व पेपरलेस कामकाज करण्याचेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. त्यादृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देशित करीत त्यांनी सर्व्हर रुमचीही पाहणी केली.
May be an image of ‎6 people and ‎text that says "‎نD Shot on OnePlus 2024.04.03 10:35‎"‎‎
रुग्णालयातील बाहयरुग्ण कक्ष, क्ष-किरण, सोनोग्राफी व सिटी स्कॅन कक्ष, पॅथोलॉजी, औषध वितरण कक्ष, अपघात विभाग, आपत्ती कक्ष, रक्तपेढी, आयसीयू, डायलिसीस, एनआयसीयू, प्रसूतीपूर्व कक्ष, शल्यचिकित्सा कक्ष, मेडिकल वॉर्ड, बालरोग विभाग, थॅलेसेमिया काळजी कक्ष, अस्थिव्यंग कक्ष, प्रसूती पश्चात कक्ष, औषध भांडार विभाग, मेडिकल रेकॉर्ड विभाग अशा विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करीत आयुक्तांनी तेथील सुधारणांविषयी सूचना केल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, शहर अभियंता श्री. संजय देसाई, उपआयुक्त श्री. योगेश कडुसकर, रुग्णालयाचे वैदयकिय अधिक्षक डॉ. रविंद्र म्हात्रे, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, वैदयकिय अधिकारी डॉ. अजय गडदे, वाशी विभाग अधिकारी श्री. सागर मोरे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. नवजात अतिदक्षता विभागाची पाहणी करताना तेथील बाळांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दूध बँक सुरु करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे थॅलेसेमिया डे केअर कक्षाची पाहणी करताना आयुक्तांनी सिकल सेल ॲनेमियाचे सेंटर अदययावत करण्याच्या सूचना केल्या.
औषध भांडार विभागाची पाहणी करताना तेथील औषधे आवक-जावक पध्दती त्यांनी जाणून घेतली. सर्व रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणच्या औषध साठयावर केंद्रीय नियंत्रण राहावे व त्या अनुषंगाने औषध खरेदी प्रणाली विकसीत करावी आणि हे सर्व कामकाज ऑनलाईन असावे या दृष्टीने तत्पर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. अशाच प्रकारे रूग्णालयाच्या मेडिकल रेकॉर्ड विभागाचेही संपूर्ण डिजीटलायजेशन करण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करावी असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.
वाशी येथील रुग्णालय हे महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील सर्वात जुने व सर्वात जास्त सेवा देणारे असल्याने या रुग्णालयावरील रूग्णांचा ताण विभागला जावा यादृष्टीने नेरुळ व ऐरोली रुग्णालयांचे अधिक सक्षमीकरण करण्याची जलद कार्यवाही करण्याबाबतही आरोग्य विभागास सूचना देण्यात आल्या. त्याचप्रमाणे वाशी रुग्णालयात येणारे विविध प्रकारचे रुग्ण लक्षात घेता त्या ठिकाणी २४ तास पोलीस कक्ष असावा यादृष्टीनेही कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *