Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील सन २०२४-२५ मधील अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द

नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील सन २०२४-२५ मधील अनधिकृत शाळांची यादी प्रसिध्द

नवी मुंबई, दि. २७: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२४ अखेर ५ प्राथमिक शाळा शासनाची/नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृतपणे चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम २००९ मधील कलम-१८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. तरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा तात्काळ बंद करावी. अन्यथा आपणाविरूध्द बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) नुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे.
या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत. तसेच ज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असेही महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.
अनधिकृत शाळांची व त्यांच्या संस्थांची नावे व माध्यम :
(1) इस्माइल एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई – अल मोमीन स्कुल, आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर-8 बी, सी.बी.डी. बेलापूर – इंग्रजी माध्यम
(2) ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट, अग्रीपाडा, मुंबई – इकरा ईस्लामिक स्कुल ॲण्ड मक्तब, सेक्टर-27, नेरूळ – इंग्रजी माध्यम
(3) आटपती एज्युकेशन ट्रस्ट, नेरूळ, सिवूड – ऑर्किडस् द इंटरनॅशनल स्कुल (CBSE), सीवुड, सेक्टर-40, नेरूळ – इंग्रजी माध्यम
(4) इलिम फुल गोस्पेल ट्रस्ट, ऐरोली – इलिम इंग्लिश स्कुल, आंबेडकर नगर, रबाळे – इंग्रजी माध्यम
(5) मारानाथ संस्था – शालोम प्रि प्रायमरी स्कुल, शिवशक्तीनगर, शर्मायी मंदिर रोड, तुर्भे स्टोअर्स, नवी मुंबई – इंग्रजी माध्यम

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *