Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नागपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या १०९ प्रकरणांत उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

नागपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या १०९ प्रकरणांत उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर, दि. २९: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. सोमवार (दि. २९) रोजी उपद्रव शोध पथकाने १०९ प्रकरणांची नोंद करून ५५ हजार ३०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ३९ प्रकरणांची नोंद करून १५ हजार ६०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून ५०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ९ प्रकरणांची नोंद करून ३६०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग, बोर्डिंगचे होर्डिंग, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करून २ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ५ प्रकरणांची नोंद करून १० हजार रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशॉप, गॅरजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ३ प्रकरणाची नोंद करुन ३ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास ३३ प्रकरणांची नोंद करून ६ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास १४ प्रकरणांची नोंद करून १४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या १ प्रकरणांची नोंद
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सोमवार (दि. २९) रोजी प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या सतरंजीपुरा झोन अंतर्गत शाहु गिफ्ट कार्नर १ प्रकरणांची नोंद करून ५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. याशिवाय धरमपेठ झोन अंतर्गत उपारकर आकांक्षा सोसायटी व गांधीबाग झोन सतीश चौधरी (बिल्डर्स) झेंडा चौक महाल कन्स्ट्रशन्स रस्त्यालगत बांधकाम साहीत्य पसरविणे या अंतर्गत दोन्ही कडुन एकुण १५ हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोन शेख इरफान अनंत कॉलोनी ताजबाग उमरेड रोड मोकळी जागेवर कचरा पसरविणे या अंतर्गत १ प्रकरणांची नोंद करुन ५ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. धरमपेठ झोन येथील म्युजीकल अकेडमी माता मंदीर रोड यांच्यावर परवानगी न घेता बॅनर आणि होर्डिग लावल्यास ५ हजार रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. असे एकूण ५ प्रकरणाची नोंद करून ३० हजार दंड वसूल करण्यात आला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *