Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवी मुंबईतील लॉजिस्टिक कंपनीला टीम ‘महाराष्ट्र वार्ता’ चा दणका; महिला सहव्यवस्थापकाचे थकीत वेतन ६० तासात व्यवस्थापनाकडून वसूल

नवी मुंबईतील लॉजिस्टिक कंपनीला टीम ‘महाराष्ट्र वार्ता’ चा दणका; महिला सहव्यवस्थापकाचे थकीत वेतन ६० तासात व्यवस्थापनाकडून वसूल

पनवेल: शनिवार दि. १८ जानेवारी रोजी महाराष्ट्र वार्ताच्या आपली समस्या या उपक्रमांतर्गत एका कंपनी विरुद्ध त्याच कंपनीच्या सह व्यवस्थापिकेने थकीत पगारा संदर्भात तक्रार नोंदविली होती.

हैदराबाद स्थित “राघवा वेअरहाऊसिंग अँड लॉजिस्टिक्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड” नामक कंपनीची रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळील तळोजा व कोप्रोली येथे मोठी गोदामे(वेअरहोऊसेस) असून सी.बी.डी. बेलापूर येथे त्यांचे विभागीय कार्यालय गेल्या आठवड्यापर्यंत चालू होते. या कार्यालयात काम करणाऱ्या पनवेलस्थित महिला सह-व्यवस्थापिकेचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे एकूण थकीत ५२,७०० रुपये वेतन देण्यास व्यवस्थापन जाणून-बुजून टाळाटाळ करत होते. याच कारणास्तव या कार्यालयातील जवळपास सर्व कर्मचाऱ्यांनी कंटाळून येथील नोकरी सोडल्याचेही आम्हाला कळले. गेल्या चार महिन्यात सदर महिला सहव्यवस्थापिकेने थकीत पगाराची रक्कम मिळविण्यासाठी बेलापूर येथील कार्यालयात अनेक खेपा मारल्या. पण अचानक गेल्या आठवड्यात कंपनी व्यवस्थापनाने बेलापूर येथील मुंबई विभागीय कार्यालयाचा गाशा अचानक गुंडाळल्याचे या महिलेस कळताच तिचे अवसान गळाले. यानंतर शनिवार दि.१८ जानेवारी रोजी ‘महाराष्ट्र वार्ता’ कडे तक्रार नोंदवताच त्याच दिवशी सायंकाळी टीम ‘महाराष्ट्र वार्ता’ तर्फे ‘राघवा लॉजिस्टिक्स’ च्या हैदराबाद स्थित मुख्यालयास संपर्क करत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राघव व महाव्यवस्थापक वेंकट स्वामी यांच्याकडे पाठपुरावा करत सोमवार दिनांक २० पर्यंत वेतनाची थकीत रक्कम त्रस्त महिला कर्मचाऱ्यास द्यावी अन्यथा मनुष्यबळ विकास विभाग तसेच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. या इशाऱ्याची तात्काळ दखल घेत ६० तासांच्या आत, काल सोमवार दि. २० रोजी रात्री उशिरा महिलेच्या खात्यात दोन महिन्यांचे थकीत वेतन कंपनीतर्फे एकरकमी जमा करण्यात आले.

देशभरात १२ शाखा असलेल्या “राघवा लॉजिस्टिक्स” सारख्या मोठ्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांच्या घामा-रक्ताच्या कमाईचे पैसे बुडविण्याचा प्रयत्न केला जातो हे चिंताजनक आहे. सरकारने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करण्यासाठी विशेष तक्रार निवारण विभाग सुरू करणे गरजेचे आहे.

आपणही जर अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या समस्यांचा सामना करत असाल तर ‘महाराष्ट्र वार्ता’ च्या आपली समस्या या विभागाला ९३७२२ ३६३३२ या क्रमांकावर आपली समस्या व्हाट्सअप्प द्वारे पाठवू शकता.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *