Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आरोग्य मंत्र : या पावसाळी भाज्या खा आणि निरोगी राहा

आरोग्य मंत्र : या पावसाळी भाज्या खा आणि निरोगी राहा

आयुर्वेद कुतूहल
पावसाळी भाज्या
पावसाळा अनेक छोटया छोटया रोपांना जीवन देतो, त्यातील काही वनस्पती ह्या आहारात उपयुक्त असतात. निसर्ग मानवाची काळजी न सांगता घेत असतो, म्हणूनच प्रत्येक ऋतूत निर्माण होणारी फळे, भाज्या ह्या त्या ऋतूनुसार आपल्या शरीरावर योग्य परिणाम करत असतात.
१) सुरण –
आपल्याला माहित असणारे आणि १२ हि महिने मिळणारे कंद म्हणजे सुरण. ह्याच सुरणाच्या प्रमुख दोन प्रजाती आहेत.
1) ग्राम्य – जे शेती करून पिकवतात
2) वन्य – जे साधारण पावसाळ्यात वनात मिळते.
वन्य सुरण पावसाळ्यात कोंबा प्रमाणे वर येतात व त्यांनाच आपण शेवलं किव्वा शेवर म्हणतो .
* दोन्ही सुरणाचे गुण हे साधारणतः सारखेच आहेत.
कफ,वात कमी करते, सांध्यांची व शरीरावरील सूज कमी करण्यासाठी मदत करते.
* भूक वाढवते, अन्नाचे पचन करते, बद्धकोष्ठ कमी होते, अर्श व्याधीत मदत करते.
म्हणूनच आहारात सुरणाचा समावेश वैद्य करायला सांगतात.
*वन्य सुरण हे ग्राम्य सुरणापेक्षा अधिक तीक्ष्ण असते त्यामुळे तोंड येणे घशाला खाज सुटणे, शरीरावर खाज येणे हे प्रकार अधिक होतात. अशावेळी लिंबू,कोकम,चिंच ह्या आंबट फळांचा वापर भाजी बनवताना करतात.
* शेवल्या बरोबर काकड नावाची आंबट फळे मिळतात जी त्याच्या भाजीत वापरली जातात.

२) टाकळा –
पावसाळ्यात येणारी अजून एक भाजी ती म्हणजे टाकळा, ज्याला आयुर्वेदात चक्रमर्द ह्या नावाने ओळखले जाते.
* टाकळा हा रक्तविकार, अनेक त्वचेचे विकार, अंगावरील खाज, कोठ ह्यांना कमी करण्यासाठी उत्तम आहारीय पदार्थ आहे.
* पोटाचे विकार, मलबद्धता, पोटात जंत होणे इ. आजारांवर टाकळ्याचा आहारात समावेश करावा.

३) करांदे –
काही ठिकाणी ह्यास डुक्कर कंद असेही म्हणतात. इंग्रजीत त्याला Air Potato म्हणतात आणि आयुर्वेदात ह्यास ‘वराही कंद’ असे नाव आहे.
* वात, पित्त, कफ ह्या तिन्ही दोषांवर त्याचे कार्य आहे.
पचनाचे विकार, मलबद्धता, कृमी ह्यांचा नाश करतो.
* रक्त व त्वचा विकारात हि उपयुक्त आहे.

४) भारंगी –
आयुर्वेदात ह्याच्या मुळांचा वापर करतात आणि पाने हि आहारात वापरतात.
* भारंगी भूक वाढवणारी,अन्नाचे पचन करणारी, मलास बाहेर टाकणारी, जंतांचा नाश करणारी आहे.
*सर्दी, खोकला, ताप, दमा व्याधीत आहारात ह्याचा समावेश अवश्य करावा.

** ह्याच भाज्यांप्रमाणे पावसाळ्यात येणाऱ्या फोडशी, कंटोली, अळू ह्यांचे गुणधर्म त्या ऋतुसाठी योग्य असतात तेव्हा ऋतूत येणाऱ्या भाज्या, फळे ह्यांचे सेवन अवश्य करावे ते आरोग्यासाठी हितकारक असते.
भेटूया पुढल्या लेखात, नवीन विषय घेऊन तोपर्यंत

भेटूया पुढील लेखात तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।

लेख आवडला असल्यास   शेअर करा  ।   LIKE  करा  ।  कंमेंट करा  

वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *