Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी नेमकं काय करावं आणि काय करू नये

जाणून घ्या वाढत्या उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी नेमकं काय करावं आणि काय करू नये

मुंबई, दि. १८: राज्यातील नागरिक सध्या उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झाले असून या लाटेच्या तडाख्यात सापडलेल्यांना अनेकविध आजारांचा सामना करावा लागत आहे. आमच्या लहानपणी किंवा १५-२० वर्षांपूर्वी उन्हाळा एवढा कडक नव्हता, आम्ही भर दुपारी मैदानात क्रिकेट खेळायला जायचो, गावभर भटकायचो पण आताचा उन्हाळा असह्य आहे असे संवाद गर्दीत सहज कानी पडत आहेत. तुम्हा आम्हाला हि या अशा उन्हाळ्याची सवय नसल्यामुळे उष्माघातापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी नेमकं काय करावं आणि काय करू नये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

 काय करावे

१)     पुरेसे पाणी प्या. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.

२)    घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.

३)    दुपारी बारा ते तीन दरम्यान घरा बाहेर जाणे टाळा.

४)   सुर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.

५)    उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी  रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

६)     हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

७)   प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

८)    उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.

९)    शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.

१०) अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

११) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

१२) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेड चा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.

१३) पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

१४) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

१५) सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.

१६) पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

१७) गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

काय करु नये

१)     उन्हात अति कष्टाची कामे करु नका.

२)     दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.

३)     दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

४)    उच्च प्रथिनयुक्त आणि शिळेअन्न खाऊ नका.

५)     लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

६)    गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

७)    बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

८)     उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *