Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

महाराष्ट्र यूपी-बिहारच्या वाटेवर? पनवेल येथील भाजप नेत्याकडून ग्रँड एन्ट्री च्या नावाखाली हवेत गोळीबार

Featured Video Play Icon

महाराष्ट्र यूपी-बिहारच्या वाटेवर? पनवेल येथील भाजप नेत्याकडून ग्रँड एन्ट्री च्या नावाखाली हवेत गोळीबार

पनवेल/नवी मुंबई: महाराष्ट्र यूपी-बिहार च्या वाटेवर तर नाही ना अशी शंका येण्यासारखी घटना दोन दिवसांपूर्वी नवी मुंबई पोलीस हद्दीतील पनवेल मधील विहिघर गावात घडली आहे. येथे क्रिकेट सामन्यांदरम्यान ग्रँड एन्ट्री च्या नावाखाली या सामन्यांचा आयोजक स्थानिक भाजप नेता पंढरीनाथ फडके याने आपल्या जवळील पिस्तूलातून ३-४ गोळ्या हवेत झाडल्या. यावेळी त्याचे समर्थक त्याच्यावर पैशांचा वर्षावही करत होते. ग्रँड एन्ट्री दरम्यान ‘बीएमडब्ल्यू घेऊन आला पंढरी शेठ फडके विहिघर वाला बिनजोड छकडेवाला’ हे गाणं डिजेवर जोरात वाजवण्यात येत होतं. या साऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सुरुवातीला पिस्तुल खेळण्यातील होते असे चित्र निर्माण करत पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण आता या प्रकरणी नवी मुंबई क्राईम ब्रँच ने सूत्र हाती घेत पंढरीनाथ फडके ला अटक केल्याचे कळते.

पंढरीनाथ फडके ने काही काळापूर्वी शेकापमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच त्याच्या नावावर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंदही आहे. पनवेल तालुक्यात सध्या नवनवे बांधकाम प्रकल्प उभारले जात असून या ठिकाणी स्थानिकांना मोठ्या रकमेचे जमिनीचे मोबदले मिळत आहेत. पुण्यात जसे काही ठिकणी नवनवे गुंठामंत्री जन्माला आले आहेत तसेच येथेही काही अशाच प्रवृत्तीच्या काही लोकांकडून पैशाचे हिडीस प्रदर्शन केले जाते. शिवाय स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी मग हवेत गोळीबार, पैशाची उधळण असे हिडीस प्रकारही केले जातात. सुदैवाने पनवेल तालुक्यातील अनेक गावांमध्ये निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे किमान परिस्थिती आटोक्यात आहे. पण असे प्रकार जर वरचेवर होत राहिले तर येथील तरुणपिढी गुन्हेगारीकडे ओढली जायला वेळ लागणार नाही. या प्रकरणी तात्पुरती कारवाई न करता आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख नवी मुंबई पोलिसांना देतील अशी आशा बाळगायला हरकत नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *