Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पनवेल येथील ‘महालक्ष्मी डेव्हलपर्स’ चा प्रताप; महालक्ष्मी नगर कॉम्प्लेक्स’ च्या प्रवेशद्वारावरचा अर्धा रस्ताच केला गायब

पनवेल येथील ‘महालक्ष्मी डेव्हलपर्स’ चा प्रताप; ‘महालक्ष्मी नगर कॉम्प्लेक्स’ च्या प्रवेशद्वारावरचा अर्धा रस्ताच केला गायब

पनवेल, दि:२९: “जो वादा किया वो निभाना पडेगा” हे भले आपलं मागण असलं तरी आपल्या स्वप्नातलं घर बांधून देण्याची नुसतीच आश्वासनं देणारे बिल्डर असे वादे अभावानेच निभावतात. कागदावर लिखित स्वरुपात दिलेल्या वाचनांना ही मंडळी केराची टोपली दाखवतात. यामुळेच “दिलेली वचन पाळेल तो बिल्डर कसला” अशीच विकासकांची सध्या प्रतिमा झालेली आहे. आज टीम महाराष्ट्र वार्ता ‘आपली समस्या’ या सदरांतर्गत अशाच एका पराक्रमी विकासकाच्या कारनाम्यांची कुंडली मांडणार आहे.

पनवेल तालुक्यातील नेरे ग्रामपंचायत हद्दीतील महालक्ष्मी डेव्हलपर्स कृत महालक्ष्मी नगर या ८०० हून अधिक घरांच्या संकुलातील नागरिकांना सध्या विकासकाने वचनपूर्ती न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतोय. जवळपास ४० एकर परिसरात पसरलेला हा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यास अनिश मेहता यांच्या महालक्ष्मी डेव्हलपर्स ने २००८ साली सुरुवात केली. २०१० सालापासून टप्प्याटप्प्याने विकासकाने येथील घरांचा ताबा देण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात या न त्या कारणामुळे विकासक आणि महालक्ष्मी नगर संकुल सतत चर्चेत राहिले. कधी बसेसच्या अडचणी तर कधी अर्धवट व निकृष्ट दर्जाची कामे. अद्यापही महालक्षी डेव्हलपर्सने ठरल्याप्रमाणे क्लब हाऊस व स्विमिंग पूल बांधून दिलेले नाही. याच सोबत सोसायटी हस्तांतरित करताना नवीन बसेस देण्याबाबतच्या या व अशा अनेक वचनांना हरताळ फासली. पण गेल्या चार वर्षांपासून महालक्ष्मी नगर सोसायटी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीय.

८०० पेक्षा जास्त घरांच्या या संकुलात प्रवेश करण्यासाठी आहे तो अंदाजे ८ फूट रुंदीचा रस्ता. हे ऐकून नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हो हीच वस्तुस्थिती आहे. महालक्ष्मी शॉपिंग कॉम्प्लेक्स जवळ या विकासकाने कलेक्टर मंजूर प्लान प्रमाणे बांधकाम न करता याच जागेच्या बाजूला असलेल्या गवते नामक जमीन मालकाची जमीन विकत घेण्याचे फक्त खोटे आश्वासन देत काही वर्षे तिचा नुसताच वापर केला. अखेर ४ वर्षांपूर्वी गवते यांनी कोर्टाचं दार ठोठावत आपली जमीन ताब्यात घेत ती खणून त्याला कुंपण घातलं. कायद्याप्रमाणे ती त्यांची स्वतःची संपत्ती असून त्या ठिकाणी ते काहीही करण्यास मोकळे आहेत. परंतू या सार्‍या घटनाक्रमानंतर महालक्ष्मी नगर कॉम्प्लेक्स मधील रहिवाश्यांच्या नरकयातनांना खर्‍या अर्थाने सुरुवात झाली. या एवढ्याशा वाटेतून फक्त एकावेळी एकच चारचाकी वाहन जाऊ शकते. शिवाय ही वाटही आता खड्डेयुक्त झाली आहे. या एका बाबीमुळे इथल्या घरांच्या किमतींनी तळ गाठला आहे. या संकुलातील घरांचा दर्जा हा चांगला आहे. पण या एका समस्येमुळे इथल्या घरांच्या किंमती विभागातील इतर घरांच्या मानाने घसरलेल्या आहेत. याला सर्वस्वी जबाबदार बिल्डर अनिश मेहता आणि महालक्ष्मी कॉम्प्लेक्स च्या आधीच्या कार्यकारिणीतील (कमिटी) सदस्य आहेत. येथील रहिवाशांचे असे म्हणणे आहे की विकासकाने मंजूर आराखड्याप्रमाणे शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम न करता रस्त्याच्या जागेत अतिक्रमण केलं व बाजूच्या गवते यांची जागा वार्षिक तुटपुंज्या भाड्यापोटी ताब्यात घेतली होती. मुळात एवढा मोठा घोटाळा येथे चालू असताना या प्रकल्पाला ताबा प्रमाणपत्र कोणत्या आधारावर दिले गेले हे मोठं कोडं आम्हाला पडलं आहे. शिवाय या काळात सदर ठिकाणी असलेली फेडरेशन म्हणजेच येथील सर्व छोट्या-छोट्या सोसायट्यांचा एकत्रित कारभार पाहणारी महासोसायटी व तिचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतर पदाधिकारी-सदस्य गप्प का होते? याकाळात त्यांनी एकदाही कोर्टाचे दार का नाही ठोठावले? विकासकाकडून सोसायटी हस्तांतरित करवून घेताना अर्धवट राहिलेली कामे का करवून घेतली नाहीत? हे व असे अनेक अनुत्तरित प्रश्न महालक्ष्मी नगर संकुलातील नागरिकांना पडले आहेत. आज या सर्व मंडळींच्या नाकर्तेपणाची शिक्षा येथील फ्लॅटधारकांना भोगावी लागत आहे.

विकासक अनिश मेहता आणि कंपनीला या प्रकरणी कोणा-कोणाचा आशिर्वाद लाभला आहे हे समोर येणं व त्यांच्यावरही कठोर कारवाई होणं हे गरजेचं आहे. एवढी मोठी फसवणूक करून बिल्डर जर खुलेआम फिरत असेल तर ही इथल्या रहिवाशांसाठीही लाजिरवाणी बाब आहे. एक चांगला व न विकला जाणारा वकील नेमण्याचा जास्तीत जास्त खर्च १० ते १२ लाख रुपये जाऊ शकतो. जर इथल्या घरमालकांनी प्रत्येकी १३०० रुपये वर्गणी काढली तरीही ही रक्कम उभी राहणे सहज शक्य आहे. पण मुळात ज्या सामान्य माणसाला ‘मला काय त्याचे म्हणत’ षंढासारखं जगायची सवय लागली आहे त्याची बुद्धी एवढी चालेल का हा मोठा सवाल. म्हणून म्हणतात की षंढ कधी बंड करू शकत नाहीत. तरीही काही मर्दांनी आणि रणरागिणींनी महाराष्ट्र वार्ता डॉट कॉम ला संपर्क करत आपली समस्या आम्हाला तपशीलवार सांगितली. आपल्याही बिल्डर अनिश मेहता यांच्या महालक्ष्मी डेव्हलपर्स बाबत अशाच प्रकारच्या तक्रारी असतील तर आम्हाला जरूर संपर्क करा.

– (आपली समस्या टीम)

आपण आपल्या समस्या आम्हाला news@maharashtravarta.com वर मेलद्वारे आणि 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे तपशीलवार कळवू शकता.

You can send details about your Issues/complaints on news@maharashtravarta.com through e-mail and on 9372236332 by Whatsapp.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *