Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

वीर भाई कोतवाल जयंतीनिमित्त पनवेल येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न

वीर भाई कोतवाल जयंतीनिमित्त पनवेल येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न

पनवेल, दि. १९: वीर भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १८ डिसेंबर, २०२३ रोजी गोखले बॅंक्वेट हॉल, पनवेल जि. रायगड मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक सुधीर मुनगंटीवार सांस्कृतिक विभाग, प्रधान सचिव विकास खारगे तसेच मार्गदर्शन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली. या वेळी झालेल्या पोवाडा व कविता सादरीकरण कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

सांस्कृतिक कार्यक्रमात शिवरत्न, शिवशाहीर वैभव घरत, शाहिर अभिषेक पाटील, सहगायक संदेश गावंड हामोनियम वैभव जोशी, ढोलकी तेजस पाटील आणि सहकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तसेच कवयित्री कविता काळे यांनी कविता सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ पत्रकार अतुल शिलवंत, प्रशांत तांबे, यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश तावरे, अरुण शिंदे, प्रदीप शिंदे, चंद्रकांत साळुंखे, अमर गायकवाड आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम केले. कवयित्री अरुणा कालेलकर, कवयित्री दया चव्हाण, कवयित्री सविता काळे, हरेश खैरे, राजेश नगरकर , प्रेमलाल ठाकूर, अतुल शिरवळकर, रोहित सिंग, विनोद केदारे लेखक, दिग्दर्शक हर्षल मसुरेकर उपस्थित होते. त्यांना पुषपगुच्छ देऊन त्यांचेही स्वागत केले. अरुणा कालेलकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन आर्यन देसाई यांनी केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *