Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (प्रॉव्हिडंट फंड) रकमेवर डल्ला मारणाऱ्या स्पाईसजेट लिमिटेडला २८ कोटी रुपये पंधरा दिवसात जमा करण्याचे ‘ईपीएफओ’चे आदेश

या व्यतिरिरिक्त दंड आणि भरपाईची रक्कमही वसूल करण्यात येईल तसेच जून २०२२ ते आजपर्यंत न भरलेल्या भविष्य निधीच्या रक्कमेविषयीचा आदेश स्वतंत्रपणे चौकशी करून काढण्यात येईल.

मुंबई, दि. २५: मार्च, २०२१ ते मे २०२२ या काळात (आणि त्यानंतरही) स्पाईसजेट लिमिटेडने SpiceJet Ltd कामगारांच्या पगारातून प्रॉव्हिडंट फंडाची (भविष्य निधी) रक्कम वसूल केली परंतु, हि रक्कम वेळीच भविष्य निधी कार्यालयात जमा केली नाही. अशा प्रकारे त्यांनी भविष्य निधी कायद्यामधील तरतुदींचा भंग केला, कामगारांचे नुकसान केले. स्पाईसजेट लिमिटेडच्या मालकांच्या या कामगारहितविरोधी कृतीविरोधी केंद्र शासनाच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून ठोस पावले उचलली जावीत यासाठी ऑल इंडिया स्पाईसजेट स्टाफ अँड एम्प्लॉईज असोसिएशनने गेली दोन वर्षे पाठपुरावा केला. भविष्य निर्वाह निधी आयुक्तांशी पत्र व्यवहार केला. वेळोवेळी होणाऱ्या सुनावणींमध्ये सहभाग घेतला व आवश्यक माहिती पुरविली. असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. जयप्रकाश सावंत Adv. Jaiprakash Sawant आणि सरचिटणीस राजेश पाटील Rajesh Patil यांनी कामगाराची बाजू प्रभावीपणे मांडली.

स्पाईसजेट SpiceJet कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर अजय सिंग Ajay Singh यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल

सातत्याच्या पाठपुराव्यामुळे अखेर प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त, दिल्ली यांनी आपल्या दिनांक १२ मार्च, २०२४ च्या आदेशाद्वारे मार्च, २०२१ ते मे २०२२ च्या काळात कामगारांचा भविष्य निधी न भरल्याची एकूण रक्कम २८ कोटी ३७ लाख ७३ हजार ७६४ रूपये येत्या पंधरा दिवसात भविष्य निधी कार्यालयात भरण्याचे आदेश स्पाईसजेट लिमिटेडला दिले आहेत. जून २०२२ नंतरही स्पाईसजेट कंपनीकडून भविष्य निधी भरला जात नाही याबद्दलहि चौकशीस सुरुवात होईल. या व्यतिरिक्त दंडाची रक्कमही कंपनीकडून वसूल करण्यात येईल असे १२ मार्च, २०२४च्या या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या कामगारांना दिलासा देणारा आणि त्यांचे मनोबल वाढविणारा हा आदेश आहे. कंपनीच्या वेळकाढू वृत्तीमुळे न्यायप्रक्रिया लांबली गेली. परंतु, शेवटी विजय सत्याचाच होतो अशा आशावादावर कामगारांचा लढा चालू राहिला व या लढ्याला यशही लाभले. ‘महाराष्ट्र वार्ता’ Maharashtra Varta या लढ्यास सुरुवातीपासून पाठिंबा देत आली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *