Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या गणपती चा दाह शांत करणारी ‘दुर्वा’ आपल्यासाठी केवढी औषधी आहे

जाणून घ्या गणपती चा दाह शांत करणारी ‘दुर्वा’ आपल्यासाठी केवढी औषधी आहे

आयुर्वेद कुतूहल
दुर्वा

गणेशोत्सव चालूच आहे म्हणून बाप्पाची एक आवडती वस्तू म्हणजे दुर्वांची माहिती आपण आज घेऊ

अनलासुराला गणेशाने गिळले आणि त्यामुळे त्याच्या पोटात प्रचंड जळजळ झाली आणि ती शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी त्यास दुर्वा खाण्यास दिल्या. म्हणूनच गणपतीला त्या प्रिय आहेत.
पुराणातील कथेतही दुर्वांच्या औषधी गुणांचे वर्णन आहे, जर दुर्वा गणपतीचा दाह शांत करू शकतात तर नक्कीच त्या मानवाचा दाह सुद्धा शांत करू शकतात.

* दुर्वा हे बहुवर्षायू क्षुप अथवा बहुवर्षायू तृण वर्गात येते जे जमिनीवर पसरते.
* दुर्वा ह्या तुरट व मधुर रसाच्या तसेच गुणांनी लघु आणि शीत असतात. म्हणूनच प्रायः पित्त व कफ दोषांचे शमन करण्याचे काम त्या करतात.
* जखम, व्रण, अर्श ह्यांमध्ये दुर्वांचा लेप लावल्यास दाह कमी होतो. डोळ्यांची जळजळ ह्यामध्ये देखील दुर्वांचा रस वापरतात. अनेक चर्मरोगांत जेथे जळजळ अधिक आहे तेथे दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा वापर केला जातो.
* मानस रोगांत व मस्तिष्क दौर्बल्य ह्यांत दूर्वांचा इतर औषधी सोबत उपयोग होतो.
* रक्तातीसार, रक्तपित्त, नाकातून रक्त येणे अशा रक्तज व्याधींमध्ये रक्त थांबवण्यासाठी दूर्वांचा वापर करतात.
* चेहऱ्यावरील मुरूम अथवा पित्ताचे चट्टे ह्यावर देखील दूर्वांचा रस कार्य करतो.
* आयुर्वेदाच्या तृणपंचमूल गणात दूर्वांचा समावेश होतो, त्यामुळे त्याचा काढा मूत्र विकारांमध्ये देखील वापरला जातो.
* दूर्वांचा रस सहज निघत नाही त्यात साखर घातली असता तो निघतो.
* आधुनिक शास्त्रानुसार त्याचे haemostatic, diuretic, antioxidant,anti arthritis, antiulcer, anti convulsion, DNA protective, immunomodulatory ह्या properties in Vivo म्हणजे प्राण्यांवर प्रमाणित झाल्या आहेत.
ह्यामधील बऱ्याच गोष्टी आपण माणसांवर देखील पहिल्या आहेत जसे की रक्त थांबवणे, चक्कर, घेरी थांबणे इ. रोगांवर पूर्वापार दूर्वांचा वापर होत आहे आणि तो पुढे हि चालू राहील ह्यातील अजून बरीच संशोधन होणे बाकी आहे.
पण आपल्या मनातील उत्कंठा आपण दुर्वांच्या रसाने इथेच शांत करूया आणि भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन. तोपर्यंत,
आयुष्य जगा आयुर्वेदासंगे ।।

लेख आवडला असल्यास   शेअर करा  ।   LIKE  करा  ।  कंमेंट करा  

वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *