Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ऍमेझॉन च्या जंगलाला लागलेल्या आगीबद्दल ‘हे’ वाचून तुमच्या छातीत धडकीच भरेल

ऍमेझॉन च्या जंगलाला लागलेल्या आगीबद्दल ‘हे’ वाचून तुमच्या छातीत धडकीच भरेल

‘ब्राझीलमधील ऍमेझाॅन जंगलाला भीषण आग लागली आहे’. ही बातमी भारतात अगदी मोजक्या लोकांनीच वाचली असेल किंवा पाहिली असेल आणि ऊरलेल्या काही लोकांना तर याबद्दल अजुन माहितीही नाही… कारण या बातमीला तेवढं मिडिया कव्हरेज नाही. जवळपास तीन आठवड्यांपासुन जगातलं सर्वात मोठं जंगल ‘ऍमेझाॅन’ हे जळत आहे. सोशल मिडीयावरील #PrayForAmazon या हॅशटॅग ट्रेंडमुळे ही घटना भारतीयांपर्यंत आत्ता कुठे हळूहळू पोहचत आहे.
एखाद्या जंगलाला यापूर्वी कधीच नैसर्गिक आग लागली नाही का? जंगलात वणवे लागुन आग लागत असते त्यात एवढ काय? ऍमेझाॅन जंगल भारतापासून खुप दूर आहे, आपला काय संबंध? आपल्याला काय फरक पडतोय असे अनेक प्रश्न आणि विचार भारतीयांच्या मनात आले असतील. ऍमेझाॅनला जंगलाला लागलेली आग हा सर्वांपेक्षा मोठा असण्याचं कारण हे की पृथ्वीवर ऑक्सिजन निर्माण करणारा एक अतिशय मोठा स्रोत नष्ट होत चालला आहे…. Amazon rainforest ही जगातली सर्वात मोठी परिसंस्था (ecosystem) आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या अनेक अतिदुर्मिळ प्रजाती फक्त  ऍमेझाॅन मध्ये आढळतात ज्या जगात इतर कुठेही आढळत नाहीत.

पण आपल्याला त्याचं काय! ती झाडं, ते कोण कधी न पाहीलेले, अभ्यासलेले प्राणी, त्यांचं कसलं दुःख करायचं! आपल्या फायद्याचं बोलू… म्हणजे नुकसानाबद्दल बोलू. जगात असलेल्या एकूण ऑक्सिजनपैकी २०% ऑक्सिजन या जंगलातून निर्माण होतो. या जंगलाला आपल्या ग्रहाची फुफ्फुसं म्हणून ओळखलं जातं. आता यापुढे आॅक्सिजनची ही निर्मिती चिंताजनक पद्धतीने मंदावणार आहे. त्यात वरून तीन आठवडे सातत्याने ज्वलन होताना आधीच किती ऑक्सिजन खर्ची पडला असेल, आणि किती प्रचंड प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात मिसळला असेल याची कल्पनादेखील भयावह आहे. परवा या जंगलापासून हजारो मैल दूर असणाऱ्या साओ पाॅओलो शहरावर भर दुपारी काळेकुट्ट ढग दाटून आले होते, धूर अन राखेचे… आणि हा सिलसिला अजून सुरुच आहे. वणवा तर अजूनही विझलेला नाहीच. आपण आधीच ग्लोबल वॉर्मिंग च्या विळख्यात असताना ही घटना हे विनाशाच्या दिशेने हे फार मोठं पाऊल आहे.

आणि आपण याबद्दल काय करु शकतो? वरवर पाहता काहीच नाही! आपण ब्राझीलला जाऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न नाही करु शकत. पण किमान यापुढे वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर पर्यावरणाचं संवर्धन नाही तर किमान नुकसान तरी घडणार नाही याकरता कसून प्रयत्न करु शकतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😔😔😔😔😔😔

– विनायक खोडके (कोल्हापूर)

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *