‘सावरकर’ नायक की खलनायक ठरवणारा तू कोण आहेस?; उद्धव ठाकरे यांचा एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराला अप्रत्यक्ष सवाल
मुंबई: काल सायंकाळी मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा ५३वा वर्धापनदिन उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी सेनेतल्या विविध नेत्यांची भाषणे झाली.
या वेळी पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या भाजप सोबतच्या युतीबाबत स्पष्ट भूमिका घेत कोणतेच मतभेद नसल्याचे जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून विरोधकांनी जी थट्टा उडवली होती त्याला त्यांनी या वेळी उत्तर दिले. अजित पवार यांच्यावरही त्यांनी या संदर्भात टीका केली. आपल्या तडाखेबंद भाषणात उद्धव ठाकरे यांनी कलम ३७०, स्वातंत्र्यवीर सावरकर, ओवेसी आणि वंदे मातरम अशा मधल्या काळातल्या पेटलेल्या विषयांवरही परखड मत व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
#या भरलेल्या व्यासपीठाचे मानकरी तुम्ही सर्वजण आहात.
# संघर्ष करत असताना मला बाळासाहेब यांची आठवण येत नाही कारण माझ्या कडे तुमच्यासारखे सवंगडी आहेत.
# देवेंद्र फडणीस यांच्यासोबत एक मोकळं वातावरण आहे.
# आता सध्या आमचे भाजप-शिवसेनेचे चालू आहे ते नाटक नसून सर्व खरं आहे.
# युतीचे जे मुद्दे ते जाहीर सभेमध्ये सगळीकडे मांडले आहेत.
# वेडात मराठे वीर दौडले सात नाही तर साथ.
# आपण ज्या वेळेला संघर्ष करत होतो त्या वेळेला विरोधी पक्ष भांडत नव्हता आणि आता तर विरोधी पक्षच नाही आहे.
# अजित पवार यांनी विनंती केली आहे. आमचे आमच्यात राहू द्या.
# आता युती झाली आहे म्हणजे मैदान साफ झालेलं आहे असे नाही तर तंगड्यात तंगडं घालून पडण्याची भीती आहे.
# आमच्या मराठीत एक म्हण आहे शुभ बोल नाऱ्या.
# जो कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नको अशी शिकवण बाळासाहेब ठाकरे यांची आहे.
# काँग्रेसचा पराभव झाला त्याबद्दल मला आनंद आहे कारण सावरकरांना डरपोक म्हणणाऱ्यांचा पराभव झाला आहे.
# नायक की खलनायक ठरवणारा तू कोण आहेस.? Abp माझाच्या पत्रकाराला विचारला जाब
# 370 कलम काढणार म्हणजे काढणार. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे.
# देशद्रोहा वरचे कलम काढणाऱ्यांचा पराभव झाला याबद्दल मला अभिमान आहे.
# आम्ही हिंदू आहेत बोलावं काही लोकांना पोटचूळ होतो.
# ओवैसी बोलतात आम्ही समान भागीदार आहोत तर वंदे मातरम बोलायला तुम्हाला लाज का वाटते.
# कोणीतरी इथे आहे का जो पाकिस्तान मध्ये बोलेल की पाकिस्तान मध्ये आम्ही भागीदार आहोत.
# हिंदू यांच्या मेंदूमध्ये मध्ये बिघाड झालेला आहे असे ओवेसी बोलतो.
# माझ्या मित्रपक्षातील माझा मित्र याला शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी बोलावल्या बद्दल आता तुमच्या पोटात का दुखतं .
# ही प्रथा आधी होती मधल्या काळात बंद पडली होती.
# मला भाजपचे देखील खासदार भेटायला आले.
# शेतकरी मदत योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे शिवसेना करणार आहे.
# आपण घेतलेला हिंदुत्वाचा वसा हा प्राण गेले तरी आम्ही सोडणार नाही.
