Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योग आवश्यक: ज्येष्ठ योगगुरू मनमोहन भुतडा

माहिती प्रसारण मंत्रालयाच्या ‘योगउत्सव २०२२’ उपक्रम संपन्न

सोलापूर, दि.१३: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमित योग करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे शरीर मन आणि आत्मा एकमेकांना जोडले जातात आणि शांततेची अनुभूती प्राप्त होते, असे मत योग सेवामंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ योगगुरू मनमोहन भुतडा यांनी आज येथे व्यक्त केले.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय लोकसंपर्क ब्‍युरो, सोलापूर आणि योगसेवा मंडळ, सोलापूर यांच्या वतीने आयोजित ‘योगउत्सव २०२२’ या कार्यक्रमात भुतडा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण योगसेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील आळंद, सचिव जितेंद्र महामुनी, सुजाता बीडकर, सतीश अग्रवाल,.आनंद काळे, माजी अधिकारी, सतीश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.

A group of people sitting on the floorDescription automatically generated with low confidence

आठव्‍या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विशेष पंधरवडा योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. योग हा एक दिवस करण्याचा नसून तो आपल्या दररोजच्या दिनचर्येचा एक भाग झाला पाहिजे असे मत यावेळी भुतडा यांनी व्यक्त केले. तसेच शिवस्मारक येथे होणाऱ्या योग शिबिरामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि आंतरराष्ट्रीय योग दिन यामध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

A group of people sitting on the floorDescription automatically generated with medium confidence

आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत देशभर वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. योगाचे प्रशिक्षण सर्वांना मिळावे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा या उद्देशाने भारत सरकारच्या प्रत्येक मंत्रालयाला ‘योगउत्सव २०२२’ अंतर्गत ७५ कार्यक्रम देण्यात आलेले आहेत. त्यापैकी ३९ व्‍या कार्यक्रमाची जबाबदारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयकडे देण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या योग कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे क्षेत्रिय लोकसंपर्क ब्‍युरो, सोलापूरचे अधिकारी चव्हाण यांनी यावेळी सांगितले. जेणेकरून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना योगाचे प्रशिक्षण मिळावे आणि योग हा शास्त्रीय पद्धतीने केला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आदिती सासवडे, मृणाली सरवदे, सुप्रिया कवठे, स्‍वानंदी माळगे, महेश सरवदे, भाविन शहा आदि उत्‍कृष्‍ट योग प्रशिक्षणार्थींना यावेळी पारितोषिके देण्‍यात आली .

A group of people standing in a roomDescription automatically generated with medium confidence

JPS/AC/DY

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *