Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खासदार उदयनराजे भोसले आणि माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर?

खासदार उदयनराजे भोसले आणि माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर?


सातारा/कोल्हापूर: राज्यात सुरू असलेले पक्षांतराचे वारे अद्याप थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस ला लागलेली गळती तर अद्यापही चालूच आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील आमदार संदीप नाईक व त्यांचे समर्थक नगरसेवक, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसल, वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. आता त्या पाठोपाठ साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खासदार उदयनराजे भोसले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. पण उदयनराजे भाजपवासी होण्याच्या मार्गावर असल्याचे कळते. जर असे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस साठी तो फार मोठा धक्का असल्याचे मानले जाते. त्याच पाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे नाराज असलेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडीकही या महिना अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे कळते. आगामी काळात काँग्रेस-राष्ट्रवादीमधून अनेक नेते भाजप व शिवसनेनेच्या तंबूत शिरणार असल्याची चर्चा आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *